नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणामध्ये आरोपी असलेले दिल्ली येथील डॉ. रविंद्रपाल सिंग जसपाल सिंग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी हा निर्णय दिला.
हे प्रकरण अतिशय गंभीर असून सर्व बाजूने सखोल तपास होणे गरजेचे आहे. रेकॉर्डवर ठोस प्राथमिक पुरावेदेखील आहेत. त्यामुळे सिंग यांना अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. मुख्य सरकारी वकील वरिष्ठ ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी प्रकरणातील विविध महत्त्वपूर्ण मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून सिंग यांना अटक करणे आवश्यक असल्याचा दावा अंतिम सुनावणीत केला होता. या प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनी सिंग यांच्यासह मुख्य सुत्रधार डॉ. क्रिष्णा, एजंट हिमांशू, त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदसामी व सहा सावकारांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यापूर्वी सिंग यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सुरुवातीला त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला होता. परंतु, अंतिम सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला.
असे आहे प्रकरणरोशन कुडे, असे किडनी विकणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रहिवासी आहेत. व्यवसायाने शेतकरी असलेल्या कुडे यांनी सावकार प्रदीप बावनकुळेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाकरिता कुडे यांचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे त्यांनी कम्बोडिया येथे किडनी विकली. या रॅकेटमध्ये सिंगसह इतर आरोपी सामील आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Web Summary : Ravindrapal Singh's anticipatory bail plea was rejected in the Chandrapur kidney sale case. The court cited the seriousness of the case and the need for a thorough investigation. He is accused along with others in a kidney sale racket involving a farmer forced by debt.
Web Summary : चंद्रपुर किडनी बिक्री मामले में रविंद्रपाल सिंह की अग्रिम जमानत याचिका खारिज। अदालत ने मामले की गंभीरता और गहन जांच की आवश्यकता बताई। वह कर्ज से मजबूर किसान से जुड़े किडनी बिक्री रैकेट में अन्य लोगों के साथ आरोपी है।