Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:23 IST2026-02-02T12:22:47+5:302026-02-02T12:23:42+5:30

व्यावसायिकाकडे दुचाकी खरेदी करण्याची बतावणी करत एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार केला होता

He comes in a whirl...' Thief absconding with a two-wheeler, defrauding a businessman | Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक

Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक

पुणे : जुनी वाहने खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाकडे बतावणी करून चोरटा दुचाकीसह पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत व्यावसायिकाने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचा जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हडपसरमधील सय्यदनगर परिसरात व्यावसायिकाचे दुकान आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चोरटा दुचाकी खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्याने व्यावसायिकाकडे दुचाकी खरेदी करण्याची बतावणी केली. एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार त्याने केला. त्यानंतर दुचाकीवरून चक्कर मारून येतो, असे सांगून तो दुचाकी घेऊन पसार झाला. दुचाकी घेऊन चोरटा पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप राऊत करत आहेत.

Web Title : पुणे: टेस्ट राइड के बहाने चोर बाइक लेकर फरार, व्यवसायी से धोखाधड़ी

Web Summary : पुणे के हडपसर में एक चोर, खरीदार बनकर, टेस्ट राइड मांगने के बाद एक व्यवसायी की बाइक लेकर फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर धोखाधड़ी की जांच शुरू कर दी है।

Web Title : Pune: Thief Flees with Bike, Cheats Businessman After Test Ride

Web Summary : A thief in Hadapsar, Pune, posing as a buyer, fled with a businessman's bike after asking for a test ride. Police have registered a case and are investigating the fraud.