शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हवेली तालुक्यात काँगे्रसकडे इच्छुकांची संख्या वाढली

By admin | Updated: January 23, 2017 02:36 IST

जिल्ह्यात सर्वाधिक १३ जिल्हा परिषदेच्या जागा असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेनेप्रमाणेच काँगे्रसकडेदेखील

पुणे : जिल्ह्यात सर्वाधिक १३ जिल्हा परिषदेच्या जागा असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेनेप्रमाणेच काँगे्रसकडेदेखील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढील आहे. जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी शंभरपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती जिल्हा काँगे्रसचे वरिष्ठ चिटणीस आतुल कारले यांनी दिली.जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी दोन निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हवेली तालुक्यातील इच्छुकांच्या मुलखाती सुरु आहेत. हवेली तालुक्यासाठी जिल्हा काँगे्रसच्या वतीने वसंतराव शेवाळे व संग्राम मोहोळ यांची नियुक्ती केली आहे. गट-गणाच्या रचनेत जिल्ह्यात हवेली तालुक्यात तब्बल तीन जागांची वाढ झाली. जिल्हा परिषदेवर हवेली तालुक्याचे वर्चस्व राहणार असल्याने सर्वच पक्षांनी या तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काँगे्रसच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून हवेली तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती सुरु आहेत. यामध्ये पूर्व हवेली तालुक्यातील देहू- लोहगाव, वाघोली-आव्हाळवाडी, पेरणे-वाडेबोल्हाई या तीन गटांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये तीन जागांसाठी तब्बल ३५ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे, तर पश्चिम हवेलीमधील आंबेगाव बु.- नऱ्हे, धायरी-नांदेड, शिवणे-कोंढवेधावडे आणि मांगडेवाडी-डोणजेसाठी १२, तर जिल्हा परिषदेसाठी, २० उमेदवारांनी पंचायत समितीसाठी मुलाखती दिल्या. थेऊर - लोणीकाळभोर, फुरसुंगी-कदमवाकवस्ती, मांजरी बु.-शेवाळवाडी, केशवनगर-साडेसतरानळी आणि उरुळीदेवाची-वडकीसाठी देखील इच्छुकांचे ५० अर्ज आले असल्याचे कारले यांनी सांगितले. मुलाखतीसाठी हवेली तालुका अध्यक्ष शिवदास काळभोर, प्रदेश काँगे्रसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील, लहू अप्णा निवंगुणे उपस्थित होते.(वार्ताहर)