Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 11:25 AM2020-10-03T11:25:30+5:302020-10-03T11:41:19+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे..

Hathras Gangrape : 'China made' bangles sent to Uttar Pradesh Chief Minister by Ncp | Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या

Next
ठळक मुद्देबारामतीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून घटनेचा निषेध

बारामती: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. .तसेच पीडितेच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की करण्यात आली.या घटनांचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. बारामती देखील त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवुन या घटनेचा निषेध करण्यात आला.

शुक्रवारी(दि २) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेक्रेटरी  मोहसिन अकबर पठाण , भरत पवार, संजय भगत, हर्षल बनसोडे आदींनी ‘चायना मेड’ बांगड्या पाठवत गांधी यांना झालेल्या घटनेचा निषेध केला.त्यासाठी बाजारपेठेतुन बांगड्या घेवुन त्या बंद लीफाफ्याद्वारे पोस्टाद्वारे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या.
उत्तर प्रदेश मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली.तसेच गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता  देशाची वाटचाल ही हुकूमशाही कडे चालली आहे. याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्पेशल चायनामेड बांगड्या पाठवून निषेध केल्याचे  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेक्रेटरी  पठाण यांनी सांगितले.

Web Title: Hathras Gangrape : 'China made' bangles sent to Uttar Pradesh Chief Minister by Ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.