शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा निम्म्याने टँकर घटले!

By admin | Updated: July 18, 2015 04:18 IST

जलयुक्त शिवार योजनेमधून झालेली कामे, जानेवारीपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी यांमुळे यंदा जिल्ह्यात

पुणे : जलयुक्त शिवार योजनेमधून झालेली कामे, जानेवारीपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी यांमुळे यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ कमी बसली. या वर्षी टंचाई काळात ४८ टँकर सुरू होते. गेल्या वर्षी टँकरची संख्या ९०च्या घरात गेली होती. आज (दि. १७ जून) जिल्ह्यात १८ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी ८८ टँकर सुरू होते.जलयुक्तमधून झालेल्या कामांचा आतापासूनच परिणाम दिसू लागला आहे. जून महिन्यात २२७.९३ मिलिमीटर इतका जिल्ह्यात पाऊस झाला. दर वर्षी तो १४२ मिलिमीटर इतका असतो. ज्या तालुक्यांत जूनचा हा पाऊस झाला, तेथे जलयुक्तमधून झालेल्या कामांमुळे जुलै महिन्यातील पाणीटंचाईची झळ कमी झाल्याचे दिसून आले. विहिरींचे उद्भव वाढल्याने पाण्यासाठीची भटकंती कमी झाली. तसेच, जानेवारीपासून जिल्ह्यात दर महिन्याला अवकाळी पाऊस पडत होता. तसेच जिल्ह्यात झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेल्या तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या व टंचाईग्रस्त २०० गावांची निवड करून सुमारे २१९ कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यांपैकी शासन निधी ३६ कोटी व लोकसहभागातून २२ कोटी, अशी ५८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. ३१ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात १४० गावे, तर राहिलेली ६० गावे ३१ डिसेंबर २०१५ व ३१ मार्च २०१६ पर्र्यंत दोन टप्प्यांत टंचाईमुक्त होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.