शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीत यंदा निम्माच साठा

By admin | Updated: August 20, 2015 02:33 IST

कुकडी प्रकल्पात आजमितीस ३९.७७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात ७७.३१ एवढा पाणीसाठा झाला होता

डिंभे : कुकडी प्रकल्पात आजमितीस ३९.७७ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात ७७.३१ एवढा पाणीसाठा झाला होता. यंदाचा प्रकल्पातील पाणीसाठा ही चिंतेची बाब असून, पावसाळ्याच्या मध्यावरच पावसाने आखडते घेतल्याने यंदा प्रकल्पातील धरणे भरतील की नाही याची चिंता आहे. त्यातच ऐन पावसाळ्याच्या हंगामातच धरणांतून पाणी सोडले जाऊ लागले आहे. सध्या डिंभे धरणातून ६५० क्युसेक्स, तर येडगाव धरणातून १४०० क्युसेक्स एवढ्या जलद गतीने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील नागरिकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांमध्ये यंदा १२.१४ टीएमसी एवढा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. मागील पावसाळ्यात आजच्या मितीस या प्रकल्पातील सर्वच धरणांमध्ये १०० टक्केच्या आसपास पाणीसाठा झाला होता. प्रकल्पातील महत्त्वाचे समजले जाणार डिंभे धरण या वेळी भरून वाहत होते. सध्या प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली असल्याने धरणामध्ये अतिशय संथ गतीने पाणी जमा होत आहे. असे असताना धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. डिंभे धरणातून आजमितीस ६५० क्युसेक्स पाणी जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात सोडण्यात येत आहे. तर येडगावमधून जवळपास १४०० क्युसेक्स एवढ्या जलद गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे आवर्तन १३ आॅगस्टपासून सुरू झाले असून, पुढे २२ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती कुकडी प्रकल्प शाखा विभागाकडून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार होतो. आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यांमधील सुमारे १५६२७८ एवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली येत आहे. (वार्ताहर)