शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 7:27 PM

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रघुनाथ राजाराम येमूल यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पुणे : बायकोचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही, असा सल्ला देऊन प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छ्ळ करायला प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरलेला कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दोन दिवस पोलीस कोठडीनंतर मंगळवारी ( दि.13) त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी येमूल याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रघुनाथ राजाराम येमूल (४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ४९८(अ), ३९२, ३५४, ३२६(अ), ३२३, ३२५, ४०६, ४२०,१२०(ब),५०६सह ३४ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल आहे. त्याच्या पोलिस कोठडीची एक दिवसाची मुदत मंगळवारी (दि.१३ ) संपली.

आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि कीर्ती गुजर यांनी चेन्नईच्या एका तांत्रिकाशी रघुनाथ येमूलने गणेश गायकवाड याची ओळख करून दिली होती. येमूल हा हस्तरेषातज्ञ आहे. त्याची प्रमाणपत्र जमा करायची आहेत. त्याच्याबाबत आणखी कुणाची तक्रार असेल तर समोर येण्याचे आम्ही आवाहन केले आहे. त्याचा तपास करायचा आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवस वाढ करण्याची मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांना केली. मात्र, चोवीस तासात एकही तक्रारदार समोर आलेला नाही. कुणी तक्रारदार पुढे आल्यास येमूल याला पुन्हा पोलीस कोठडी देता येऊ शकते असा युक्तीवाद आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रताप परदेशी आणि कीर्ती गुजर यांनी केला. तो मान्य करीत न्यायालयाने येमूलला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी मे. एस. व्ही. निमसे कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

आरोपीविरुद्ध फिर्यादीमध्ये कोठेच उल्लेख नसून, कलम ३२६(अ) बद्दल पुरवणी जबाबामध्येही फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध उल्लेख केला नसून आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.कोर्टाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.  -------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटकAdhyatmikआध्यात्मिक