पालिका रुग्णालयाच्या जागी गोडाऊन

By Admin | Updated: May 29, 2014 05:20 IST2014-05-29T05:20:19+5:302014-05-29T05:20:19+5:30

वानवडी येथील मोक्याच्या ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयासाठी आरक्षित असलेले सुमारे २५ हजार चौरस फूट बांधकाम वापराविना धूळ खात पडले आहे.

Godown in place of municipality | पालिका रुग्णालयाच्या जागी गोडाऊन

पालिका रुग्णालयाच्या जागी गोडाऊन

 पुणे : वानवडी येथील मोक्याच्या ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयासाठी आरक्षित असलेले सुमारे २५ हजार चौरस फूट बांधकाम वापराविना धूळ खात पडले आहे. कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या महापलिका रुग्णालयाचा गोडाऊन म्हणून केला जात आहे. महापालिकेचे भवन, भूमी जिंदगी व आरोग्य विभागाच्या समन्वयाअभावी ही इमारत धूळ खात पडल्याची माहिती समोर आली आहे. वानवडी येथे परमार बिल्डर यांच्याकडून महापालिकेला आर-७ या नियमानुसार २५,००० चौरस फुटांचे बांधकाम रुग्णालयासाठी उलब्ध करून देण्यात आले आहे. वानवडीतील मोक्याच्या जागेवरील रुग्णालयाची जागा ७ ते ८ वर्षांपासून वापराविना धूळ खात पडली आहे. कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी रुग्णालयापैकी सुमारे ८ हजार चौरस फूट जागा क्षेत्रीय कार्यालयासाठी दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून काही भागांत क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले आहे. मात्र, कोट्यवधी किमतीची हजारो चौरस फुटांची जागा केवळ महापालिकेच्या विविध विभागांत समन्वय नसल्याने धूळ खात पडल्याचा प्रकार बुधवारी उजेडात आला. सध्या क्षेत्रीय कार्यालयाने या जागेचा वापर कचरा बकेट व साहित्य ठेवण्यासाठी गोडाऊन म्हणून सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Godown in place of municipality