शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शासनादेशाची वाट न पाहता बक्षिसे द्या

By admin | Updated: July 16, 2014 04:13 IST

महापालिकेने तीन आॅलम्पिकपटूंना शासनाची मान्यता न घेता प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले.

पिंपरी : महापालिकेने तीन आॅलम्पिकपटूंना शासनाची मान्यता न घेता प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले. शहरातील खेळाडूंना मात्र नियमावर बोट दाखवून बक्षिसापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. शासनादेशाची वाट न पाहता सर्व खेळाडूंना बक्षिसाची रक्कम महापालिकेने द्यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महापालिकेतर्फे बक्षीस दिले जाते. २००८ पासून २७ खेळाडूंना बक्षीस जाहीर केले. मात्र, त्यापैकी पाच खेळाडूंना महापालिकेने बक्षिसाची रक्कम दिली. तीन लाखांहून अधिक रकमेच्या बक्षिसासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असताना महापालिकेने अभिनव बिंद्रा, विजेंद्र सिंग व सुशील कुमार या तीन आॅलम्पिकपटूंना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले. या रकमेचा प्रस्ताव अद्यापही शासनाकडे पडून आहे. महापालिकेने विराज लांडगे व मोमीन शेख या दोन खेळाडूंना प्रत्येकी २ लाख ९९ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. उर्वरीत ज्या २२ खेळाडूंना बक्षीस जाहीर केले होते, ते देताना वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत.वैयक्तिक स्वरूपात बक्षीस देता येत नाही. क्रीडा संस्थेला बक्षीस रक्कम देता येते, असे क्रीडा विभागाचे अधिकारी सांगतात. वेळोवेळी सबब सांगून बक्षीस देण्याचे टाळले जाते. महापालिका नियम दाखवून स्थानिक खेळाडंूना बक्षीस रक्कम देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. अनावश्यक कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी करणाऱ्या महापालिका प्रशासनाला खेळाडूंविषयी आस्था नाही, असा संताप स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी व्यक्त केला. महापालिका सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी महापौर मोहिनी लांडे यांनी महापालिका सभागृहातील सत्कार समारंभ बंद केले. त्याऐवजी महापौर दालनामध्ये सत्कार समारंभ होऊ लागले. यापुढे महापालिका सभेतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला जावा, अशी भूमिका स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)