शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मुली परतल्या; शाळेत नाहीत!

By admin | Updated: July 7, 2016 03:28 IST

शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात मुली परतल्या; मात्र या मुलींना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य न दिल्याने त्या शाळेत हजर राहू शकल्या नाहीत. बालगृहाच्या अधीक्षिका एस. बी. भोरकर

शिरूर : शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात मुली परतल्या; मात्र या मुलींना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य न दिल्याने त्या शाळेत हजर राहू शकल्या नाहीत. बालगृहाच्या अधीक्षिका एस. बी. भोरकर यांनी शासनाने गणवेशासाठी तरतूदच केली नसल्याचे भ्रमणध्वनीवर सांगितले. मात्र गणवेशासाठी मागील वर्षी आणलेले कापड बालगृहात वर्षभरासाठी पडून असल्याचा धक्कादायक प्रकार मुलींनीच समोर आणला.‘लोकमत’च्या वृत्ताने सहा मुली परतल्या; मात्र त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. बालगृहात जाऊन माहिती घेतली असता, बालगृहात येऊनही मुली शाळेत गेल्या नसल्याचे निदर्शनास आले. आरटीआय कार्यकर्ते संजय पाचंगे, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिव नम्रता गवारी यांनीही मुलींची विचारपूस केली.आम्हाला गणवेश नसल्याने, तसेच शैक्षणिक साहित्य नसल्याने शाळेत गेलो नसल्याचे मुलींनी सांगितले. याबाबत पाचंगे यांनी भोरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, भोरकर यांनी शासनाने गणवेशासाठी तरतूदच केली नसल्याचे सांगितले. मुलींना गणवेशाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, की गणवेशाचा कपडा व इतर शैक्षणिक साहित्य मागील वर्षी संस्थेत आले. आम्ही स्वत: हे सर्व साहित्य बालगृहात उतरवताना पाहिले. उतरवताना सहकार्यही केले. मागील वर्षभर बालगृहाने सर्व मुलींना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्यापासून परावृत्त ठेवले. कसेबसे मुलींनी मागील वर्ष काढले.संस्थेत कपडा असताना भोरकर यांनी तरतूद नसल्याची खोटी माहिती दिली. ४ मुलीं दहावी इयत्तेत असताना, अगोदरच त्यांची २१ दिवस अनुपस्थिती लागलेली असतानादेखील मुलींच्या गणवेशाबाबत तसेच इतर साहित्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने गांभीर्याने दखल घेतली नाही. पाचंगे यांनी दुकानातून सहा मुलींसाठी गणवेशाचा कपडा खरेदी करून त्यांच्या ताब्यात दिला. आमच्या खोलीत वीज नाही, पाण्याची सोय नाही अशा तक्रारी मुलींनी मांडल्या. महिला बालकल्याण विभागाचे उपायुक्त शिरसाट यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शिरूरहून बोलतोय, असे म्हणताच फोन कट केला. पुन्हा फोन घेतलाच नाही. (वार्ताहर)मिरॅकल इंटरनॅशनल फाउंडेशनने या बालगृहाला मागील आॅगस्टमध्ये भेट दिली असून, हे बालगृह दत्तक घेण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी महिला बालकल्याण विभागाचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. उद्या महिला बालकल्याणचे अधिकारी बालगृहाला भेट देणार आहेत.