शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार महिलांना स्वच्छतागृहांची भेट

By admin | Updated: August 29, 2015 03:40 IST

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्ह्यातील ७०० गावांतील तब्बल १० हजार महिलांना स्वच्छतागृहाची भेट देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने रोटरी क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम

- सुषमा नेहरकर-शिंदे,  पुणेराखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्ह्यातील ७०० गावांतील तब्बल १० हजार महिलांना स्वच्छतागृहाची भेट देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने रोटरी क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला असून, ही गावे निर्मलग्राम होणार आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा लवकरात लवकर निर्मल करण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या पुढाकारामुळे रोटरी क्लबच्या सहकार्याने निर्मलग्रामच्या मोहिमेला आणखी गती देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून केंद्र शासनाची निर्मलग्राम अभियान योजना राबविण्यात येत आहे. त्यापूर्वी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरूआहे. यामुळे राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात निर्मलग्राम अभियानात चांगले काम झाले आहे. परंतु जिल्हा शंभर टक्के हगणदरीमुक्त करण्यासाठी मोठा टप्पा गाठावा लागणार आहे. जिल्ह्यात १४०४ पैकी केवळ २३३ ग्रामपंचायती शंभर टक्के हगणदरीमुक्त झाल्या आहे. तर एका गावात ५०पेक्षा कमी शौचालये बांधणे शिल्लक असलेल्या गावांची संख्या ६९१ आहे. त्यामुळे किमान ही गावे हगणदरीमुक्त केल्यास मोठे काम होईल. सध्या शौचालयासाठी २५ ते ३० हजार खर्च येतो. त्यामुळे बांधकामासाठी निधी उपलब्ध न करता तयार शौचालयाच्या किटचे वाटप करण्यात येईल. याची किंमत २२ हजार रुपयांपर्यंत जाते. यामध्ये रोटरी क्लबच्या वतीने १० ते १२ हजार एका शौचालयासाठी देण्यात येतील, तेवढाच वाटा जिल्हा परिषद उचलणार आहे. यासाठी १२ कोटींची तरतूद करावी लागणार असल्याचे उमाप यांनी सांगितले.जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये महिला उघड्यावर शौचालयाला जातात, ही अत्यंत शरमेची बाब आहे. शौचालय नसल्यामुळे महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळेच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दहा हजार शौचालयांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. रोटरी क्लबच्या मदतीने हे वाटप करण्यात येणार आहे. शौचालयाबरोबरच त्याचा स्नानगृह म्हणूनही वापर करता येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. - कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद