शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सावरदरीला गॅसवाहिनी फुटली

By admin | Updated: January 17, 2015 23:38 IST

पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू असताना येथील गॅस पाईपलाईनला पोकलेन मशिनचा दात लागल्याने मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली.

आंबेठाण : पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू असताना येथील गॅस पाईपलाईनला पोकलेन मशिनचा दात लागल्याने मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली. ही घटना सावरदरी परिसरात शनिवारी (दि. १७) रात्री घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनसाठी चिखली येथून नॅचरल गॅस आणला जातो. सावरदरी येथील ब्रिजस्टोन, हुंदाई आणि इतर कंपन्याना या गॅसचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी लोखंडी पाईपलाईन तर काही भागात प्लॅस्टिकच्या पाईपलाईनद्वारे गॅस वाहून नेला जातो. या परिसरातूनच भामा-आसखेड धरणावरून पुण्याला पाणी नेण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. ही पाण्याची लाईन खोदत असताना पोकलेन मशिनच्या खोऱ्याचा दात लागल्याने प्लॅस्टिकचा पाईप फुटला आणि मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. कामगारांची धावपळ४या गॅसची तीव्रता एवढी मोठी होती, की जवळपासच्या ३०० ते ४०० मीटर परिसरात हा वायू पसरला होता. या वाहिनीलगतच १५ ते २० फूट अंतरावर चारपदरी रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होती. ४जवळपास अर्धातास गॅसची गळती सुरू होती. या गळतीमुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची धावपळ उडाली. ४चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील संबंधित अधिकारी आल्यानंतर त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्रभर दुरुस्तीचे काम सुरू होते. मुख्य वॉल बंद केल्यानंतर गॅसगळती थांबली.