शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये ५० दिवसांनंतरही गॅस तुटवडा कायम; घरगुती ग्राहक आजही त्रस्त, व्यावसायिकांचे हाल सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:13 IST

गेल्या ५० दिवसांत सुमारे ५५ लाखांपेक्षा अधिक गॅस बुकिंग नोंदवले गेले; पण प्रत्यक्षात फक्त २५ ते ३० लाख सिलिंडरच वितरित झाली आहेत

पिंपरी : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा एप्रिल अखेरपर्यंत कायम आहे. तब्बल ५० दिवसांनंतरही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. गॅसची मागणी वाढलेली असताना पुरवठा मात्र स्थिर राहिल्यामुळे घरगुती ग्राहकांना आजही १० ते १५ दिवस सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे, व्यावसायिक गॅसपुरवठा अधिक कठीण झाला आहे. शासनाने ५० टक्के पुरवठ्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु कंपन्यांनी फक्त २० टक्के पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. कडक अटींमुळे लहान व्यावसायिकांना गॅस वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून लघुव्यावसायिकांपर्यंत सर्वच घटक त्रस्त आहेत, त्यामुळे बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुरवठा तातडीने वाढवण्याची मागणी होत आहे. प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी समन्वयाने उपाययोजना केल्याशिवाय परिस्थिती पूर्वपदावर येणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ११ ते १५ लाख एलपीजी ग्राहक असून ७५ हून अधिक गॅस एजन्सीमार्फत सिलिंडरचे वितरण होते. पूर्वी दररोज सुमारे ५६ हजार सिलिंडरची मागणी होती; परंतु गेल्या दीड महिन्यात ती दुपटीने-तिपटीने वाढून १ लाख ते १.१२ लाखांपर्यंत पोहोचली. मात्र, पुरवठा अजूनही सुमारे ५६ हजार सिलिंडरचा आहे; यामुळे दररोज ४० ते ५० हजार सिलिंडरची तफावत आहे.

घरगुती ग्राहक हवालदिल

गेल्या ५० दिवसांत सुमारे ५५ लाखांपेक्षा अधिक गॅस बुकिंग नोंदवले गेले; पण प्रत्यक्षात फक्त २५ ते ३० लाख सिलिंडरच वितरित झाली आहेत. त्यामुळे सुमारे २५ लाख सिलिंडरचा बॅकलॉग निर्माण झाला आहे. प्रशासनाने ९६ तासांत घरपोच वितरण, ओटीपीशिवाय वितरणास बंदी आणि थेट विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आजही १० ते १५ दिवस वाट पाहूनही गॅस न मिळाल्यामुळे घरगुती ग्राहक हवालदिल झाले आहेत; त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, असे चित्र आहे. शहरातील ग्राहकांची अचूक संख्या उपलब्ध नसल्यामुळे नियोजनात मोठ्या त्रुटी असल्याचेही समोर आले आहे.

घरगुती आणि व्यावसायिक गॅसला मागणी आजही दुप्पट आहे. पुरवठा मात्र स्थिर आहे; त्यामुळे वितरण व्यवस्थेवरचा ताण कायम आहे. शासनाने नियम व अटींचे अनेक निर्बंध घातले आहेत. अनेक ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही आणि पत्ते बदलले आहेत. अशा तांत्रिक कारणांमुळे वितरणाचा कालावधी वाढला आहे.- एक एजन्सीचालक

व्यावसायिक गॅस मिळवण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. त्या पूर्ण केल्या तरीही गॅस मागणीइतका पुरवठा होत नाही. जे सिलिंडर मिळतात तेही वेळेवर मिळत नाहीत. - एक हॉटेलचालक, चिखली

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad gas shortage persists after 50 days, consumers suffer.

Web Summary : Pimpri-Chinchwad faces a severe gas shortage even after 50 days. Domestic consumers await cylinders for weeks, while businesses struggle due to limited supply. Demand has doubled, but supply remains constant, creating a massive backlog and widespread distress. Urgent action needed.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCylinderगॅस सिलेंडरFuel Crisisइंधन टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरHomeसुंदर गृहनियोजन