शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी घरातच फुलविला बगीचा

By admin | Updated: February 2, 2015 02:27 IST

वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये चिमण्यादेखील हरवून गेल्या आहेत. तसेच सतत होणारी वृक्षतोड व अनेक कारणांमुळे

प्रियांका लोंढे , पुणेवाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये चिमण्यादेखील हरवून गेल्या आहेत. तसेच सतत होणारी वृक्षतोड व अनेक कारणांमुळे पक्ष्यांचा अधिवास शहरी भागात रोडावलेला दिसतोय. अशातच नेहा जोशी या विद्यार्थिनीने केवळ पक्षिप्रेमापोटी आपल्या घरातच पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी बाग फुलविली आहे. कोणत्या झाडावर कोणते पक्षी जास्त प्रमाणात येतात, पक्षी काय खातात, अशा प्रकारचे संशोधन करुन वेगवेगळी झाडे तिने आपल्या घरातील बगीचामध्ये लावली. कुंड्यांमध्ये झाडे लावली तर त्यावर चिमणी किंवा छोट्या पक्ष्यांशिवाय दुसरे पक्षी येणार नाहीत, हे समजल्यावर नैसर्गिक पद्धतीने झाडांना जंगल इफेक्ट दिला. त्यामुळे सर्व प्रकारचे पक्षी येऊ लागले.कुंड्यांमध्ये थोडा कचरा झाला तरी आपण तो साफ करतो. परंतु, कचऱ्यामध्ये काही वेळा पक्ष्यांचे अन्न दडलेले असते. पालापाचोळा गोळा करणे व कचऱ्यातील अळ्या खाण्यासाठी पक्षी घरातील झाडांवर येतात. सनबर्ड, बुलबुल, पेंटास या पक्ष्यांसह फुलपाखरे व इतर पक्षी देखील बागेमध्ये येऊ लागले आहेत.पर्यावरण, निसर्ग, झाडे व पक्ष्यांविषयी लहानपणापासूनच आवड होती. एम.एस.सी.करताना पर्यावरण विषयात अभ्यास केला. पक्ष्यांना निवारा मिळण्यासाठी काय करता येईल, कशा प्रकारे झाडे लावता येतील यावर विचार सुरु केला आणि घरातच झाडांना जंगल इफेक्ट देऊन बाग तयार केल्याचे नेहाने सांगितले. शहरी भागातून हरवलेल्या पक्ष्यांचा अधिवास वाढवायचा असेल तर अशा प्रकारे प्रत्येकाने घरातल्या घरात थोडी झाडे लावली तरी पक्ष्यांचे अस्तित्व टिकण्यास मदत होईल, असेही ती म्हणाली. (प्रतिनिधी)