शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाची जागा बनली कचरा डेपो

By admin | Updated: May 26, 2014 05:34 IST

नगर परिषदेने शहरातील आर्थिक दुर्बल मागासवर्गीयांच्या एकत्रित घरकुलांसाठी जागा आरक्षित केली.

इंदापूर : नगर परिषदेने शहरातील आर्थिक दुर्बल मागासवर्गीयांच्या एकत्रित घरकुलांसाठी जागा आरक्षित केली. त्या जागेवर घरांऐवजी केरकचरा, मेलेली जनावरे, भटकी कुत्री, दुर्गंधी व अस्वच्छता नांदत असून, एकत्रित घरकुलाची योजना हवेत विरली आहे. सन २००७-०८ मध्ये इंदापूर नगर परिषदेच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेसाठी नगर परिषदेने सर्वेक्षण केले होते. प्रत्येकी एक लाख रुपये खर्चाचे २२५ चौरस फूट बांधकाम अंतर्भूत असणारे हॉल, बेडरूम, किचन ओटा, सिंकसह स्वयंपाकघर, टॉयलेट आदी सुविधा असणारे घरकुल, मागासवर्गीय व झोपडपट्टीवासीयांना देण्यात येणार होते. त्यासाठी झोपडपट्टीधारकांची यादी नगर परिषदेने तयार केली होती. त्या यादीनुसार शासकीय कोकतळे (३१), एस.टी. स्टँडमागील परिसर (६२), जावईवाडी (६१), शाहूनगर (७१), साठेनगर रामोशी गल्ली (१३९), आंबेडकरनगर (१३०), म. फुलेनगर (९०), दूध डेअरी वसाहत (३४), बाजारतळ, व्यंकटेशगनर (१०६) असे एकूण ७२४ लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. या घरकुलांसाठी जोतिबाच्या मंदिरानजीकची सर्वे नं. ८१० मधील जागा, आरक्षण क्र. १९ नुसार आरक्षित करण्यात आली. मात्र, अचानक ही योजना हवेत विरली. या आरक्षित जागेवर सध्या नगर परिषदेने कचरा डेपो केला आहे. घनकचरा व्यवस्थापनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत, त्याचा कसलाही अंमल होत नाही. ओला व सुका कचरा वेगळा काढणे, रोजचे रोज कचरा उचलला जाणे, गँस प्लांटद्वारे कचर्‍याची विल्हेवाट लावणे, त्यावर वीजनिर्मिती असे काहीही केले जात नाही. जुलैमध्ये कचरा उचलण्यासाठी नवीन गाड्या घेतल्या, त्याचे भाडे वसूल केले जात नाही. मोठ्या गटारी साफ केल्या जात नाहीत. हा सर्व कचरा जेथे टाकला जातो, तेथे पूर्वीपासून जोेतिबाचे मंदिर आहे, लोकवस्तीही आहे. मंदिराच्या पावित्र्याला कचर्‍यामुळे बाधा येत आहे. एकत्रित घरकुलाबरोबरच आॅगस्ट २०११ मध्ये नगरपरिषद हद्दीतील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेने अर्ज मागविले होते. पुढे त्याचे काय झाले, ही बाबही हवेत विरली आहे.(वार्ताहर)