शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकांना लुटणारी टोळी खेड शिवापूर येथे गजाआड

By admin | Updated: May 30, 2014 04:42 IST

येथे (ता. २८) पुणे-सातारा हायवेवर रात्री-अपरात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांची लूटमार करणार्‍या टोळीला राजगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली

खेड शिवापूर : येथे (ता. २८) पुणे-सातारा हायवेवर रात्री-अपरात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांची लूटमार करणार्‍या टोळीला राजगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. लूटमार करणार्‍या टोळीने बुधवारी रात्री दीडच्या सुमारास वर्वे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरचालक नाना वाघमोडे (वय २९, रा.एखतपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांस चाकूचा आणि काठीचा धाक दाखवला. त्याला गाडीपासून दोनशे मीटर लांब बाजूला नेले. त्या ठिकाणी त्याच्याजवळ असलेला मोबाईल व रोख रक्कम साडेचार हजार जोर जबरदस्तीने काढून घेऊन त्यांनी सातारा बाजूच्या दिशेने धूम ठोकली. त्या ट्रकचालकाने लगेचच दुसर्‍या ट्रकचालकाडून मोबाईल घेतला आणि १०० क्रमांकावर कंट्रोल रूमला पोलिसांशी संपर्क साधला. राजगड पोलिसांना कंट्रोल रूमकडून माहिती मिळताच खेडशिवापूर टोलनाक्यावर तपासणी सुरू केली. काही वेळातच त्या ठिकाणी दोन दुचाकीवरून पाच जण आले. समोर पोलिस तपास करीत असल्याचे त्या पाच जणांच्या लक्षात आल्यानंतर ते तेथून पळून जावू लागले. पोलिसांनी प्रसंगावधान साधून ते पाच जण संशयास्पद वाटल्यामुळे पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. अटक केल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांचा इतर गुन्ह्यांशी संबध असल्याची दाट शक्यता आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक शाहूराव साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.(वार्ताहर)