तडीपार गुंडाला अटक

By Admin | Updated: February 21, 2017 03:12 IST2017-02-21T03:12:19+5:302017-02-21T03:12:19+5:30

कुख्यात राकेश भरणे टोळीच्या सराईत गुंडाचा साथीदार असलेल्या तडीपार तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या

The fugitive gangrape arrested | तडीपार गुंडाला अटक

तडीपार गुंडाला अटक

पुणे : कुख्यात राकेश भरणे टोळीच्या सराईत गुंडाचा साथीदार असलेल्या तडीपार तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने गजाआड केले.
तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. अनिल तुकाराम मोहिते (वय ३९, रा. दत्तमंदिराजवळ, वाकड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गर्दी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. मोहिते याला परिमंडल तीनच्या उपायुक्तांनी तडीपार केले आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्याची दहशत आहे. तो कर्वेनगर परिसरात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Web Title: The fugitive gangrape arrested