शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ठेव पावत्या सादर करुन 'मिलिटरी फार्मस'ची ३८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:10 IST

हैदराबादच्या दोघा ठेकेदारांवर गुन्हा दाखल

पुणे : मिलटरी फार्मसला अन्नधान्य पुरविण्याचा ठेका घेताना बनावट नुतनीकरण ठेव पावती व फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर केल्या. हैदराबादच्या दोघा ठेकेदारांनी मिलटरी फार्मसची तब्बल ३८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी ले. कर्नल अविनाश शर्मा (वय ५०, रा. फार्म हाऊस मिलिटरी, सिकंदराबाद) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धर्मा देवी (आंध्रा सेल्स कॉर्पोरेशन रा. हैदराबाद) आणि मनोज अगरवाल (बालाजी कॉर्पोरेशन रा. मलाकपेठ, हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सदर्न कमांड मुख्यालयातील मिलटरी फार्मस येथे २९ जून २०१२, २ जुलै २०१३ आणि २७ जानेवारी २०१४ यावेळी घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलटरी फार्म यांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी सदर्न कमांडमधील मिलटरी फार्मस यांनी निविदा काढल्या होत्या. त्यात या दोघांनी भाग घेतला. त्या प्रक्रियेत या दोन्ही फर्मनी ३८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची नुतनीकरण ठेव पावत्या व फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर केला. त्यानुसार त्यांना अन्नधान्य पुरवठा करायचा ठेका मिळाला व त्यांनी कामकाज सुरु केले. त्यानंतर या दोन्ही फर्मनी दिलेल्या सुरक्षा ठेव पावत्यांची लेफ्टनंट कर्नल शर्मा यांनी हैदराबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे शहानिशा केली. तेव्हा बँकेने अशा प्रकारच्या पूर्वी नुतनीकरणाच्या कोणत्याही ठेवी न ठेवण्याबाबतची माहिती दिली. या दोन्ही संस्थांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बनावट पावत्या तयार करुन त्या खर्‍या असल्याचे भासवून त्या सदर्न कमांड कार्यालयात सादर करुन लष्कराची ३८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. कोविड -१९ मुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याने फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस