शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून कऱ्हेचे बंधारे कोरडे  : पावसाने फिरवली पाठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:32 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही.

ठळक मुद्देनाझरे व पुरंदर उपसाचेही पाणी सोडण्याची मागणी

काऱ्हाटी  : कऱ्हा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे चार वर्षांपासून कोरडे ठणठणीत आहेत. नाझरे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरंदर उपसाचे पाणी सोडून बंधारे तातडीने भरण्याची मागणी नदीकाठच्या गावातून केली आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागासाठी शासनाने आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी हायस्कूल, जगतापवस्ती, जळगाव कडेपठार, लोणकरवस्ती, कदम वस्ती,कऱ्हा वागज, बऱ्हाणपूर, अशा अनेक भागांत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून या भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीला त्याचा फायदा झाला. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भागवण्यास मदत झाली. मात्र, सलग चार वर्षांपासून या भागात अत्यल्प पडणारा पाऊस व या बंधाऱ्यात पावसाव्यतिरिक्त कुठलेही पाणी येत नसल्यामुळे हे बंधारे कायमच कोरडे ठणठणीत आहेत.बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही. मात्र, या भागाच्या दक्षिण व  उत्तर दिशेला  वाहणारी नीरा व भीमा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या भागातून जाणारी कऱ्हा नदी मात्र कोरडी ठणठणीत आहे. अशाच वेळी पुरंदर उपसा व जानाई शिरसाई उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून बंधारे  भरण्याची  गरज आहे. मात्र या भागाचं वास्तव्य  शासन दरबारी कोणी मांडत आहेत, की  नाही, या भागाचे लोकप्रतिनिधी  नक्की काय करत आहेत, असा परखड सवाल काºहाटी येथील शेतकरी शिवाजी वाबळे यांनी बोलताना व्यक्त केले. 

सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.  अशा वेळी पुरंदर उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरावेत अन्यथा रिमझिम पावसाच्या जोरावर केलेल्या शेतातील पिकांचे  पाण्यावाचून मोठे नुकसान होणार आहे. पिके वाचविण्यासाठी नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींकडून पाटबंधारे खात्याला तोंडी मागणी केली मात्र त्याचा उपयोग होत नसल्याने आता लेखी पत्र देऊन  मागणी करणार आहे.- बी. के. जाधव, सरपंच

टॅग्स :BaramatiबारामतीriverनदीRainपाऊस