शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरपंचासह चौघांना अटक

By admin | Updated: March 10, 2015 04:51 IST

पुरंदर तालुक्यातील मौजे साकुर्डे येथे एक महिन्यापूर्वी शेतकरी अशोक जाधव यांच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील मौजे साकुर्डे येथे एक महिन्यापूर्वी शेतकरी अशोक जाधव यांच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून साकुर्डे गावाच्या माजी सरपंचासह चौघांना पोलिसांनी कट रचून खून केल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक केली आहे. त्यांना सासवड न्यायालयात हजर केले असता आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पूर्ववैमनस्य व जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुलतान यासीन सय्यद (वय २९), अतुल मारुती सस्ते ( वय २०), धनंजय नाना खोमणे ( वय २५), भानूदास नाना खोमणे (वय २१), आणि मारुती गेणबा सस्ते (वय ५३, सर्व रा़ साकुर्डे ता. पुरंदर ) अशी त्यांची नावे आहेत़ एक महिन्यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी साकुर्डे येथील शेतकरी अशोक बाजीराव जाधव यांचा तक्रारवाडी साकुर्डे रोड वरील एका शेतात रात्री १० वाजण्याच्या सुमारास खून झाला होता. खून प्रकरणामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण होते. मागील साडेचार वषापूर्वी याच शेतकऱ्याच्या घरावर दरोडा पडला होता, यात त्यांच्या पत्नीचा खून झाला होता. त्या ही प्रकरणाचा छडा न लागल्याने ग्रामस्थांत पोलीसाबद्दल प्रचंड नाराजी होती. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज लोहिया आणि अप्पर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटना स्थळाला भेट देवून कुटुंबियांशी चर्चा केली होती. त्यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीयार्ने घेवून कोणत्याही परिस्थितीत गुन्ह्याचा तपास लागलाच पाहीजे अशा स्पष्ट सूचना जेजुरी पोलिसांना दिल्या होत्या. जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस एक महिनाभर कसून तपास करीत होते. पोलिस कर्मचारी रणजीत निगडे, संदीप पवार, घनशाम चव्हाण यांनी वेषांतर करून तब्बल महिनाभर साकुर्डे गावात तळ ठोकला होता. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलिस हवालदार शिवा खोकले, कर्मचारी संतोष अर्जुन, संदीप कारंडे, संतोष कानतोडे, विशाल जावळे, आण्णा देशमुख, संतोष मेढेकर यांचे पथक गुप्त माहीती गोळा करीत होते. अखेर पोलिसांना तपासात यश आले.