शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र हिसकावण्याच्या दिवसभरात चार घटना

By admin | Updated: October 27, 2015 01:05 IST

पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पुणे दौऱ्यावर असतानाच सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढत रविवारी दिवसभरात तीन महिला आणि एका पुरुषाचा ऐवज हिसकावला

पुणे : पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पुणे दौऱ्यावर असतानाच सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढत रविवारी दिवसभरात तीन महिला आणि एका पुरुषाचा ऐवज हिसकावला. या घटना हडपसर, दापोडी, बोपोडी आणि शुक्रवार पेठेमध्ये घडल्या. या चार घटनांमध्ये मिळून चोरट्यांनी एकूण १ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास केला. हडपसर पोलीस ठाण्यात ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या गेटसमोरून पायी जात होती. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी पावणेपाचच्या सुमारास घडली, तर बोपोडीमधील भाऊ पाटील रस्त्यावर रविवारी संध्याकाळी ३९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. दापोडीतील गणेश हाईट्स सोसायटी रस्त्यावरून चालत घराकडे जात असताना ४७ वर्षीय महिलेचे ३७ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावल्याची तिसरी घटना घडली. सांधेदुखीवर औषध देण्याच्या बहाण्याने आलेल्या जाधव नावाच्या व्यक्तीने ज्ञानोबा देशमुख (वय ७९, रा. शुक्रवार पेठ) यांच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी काढून घेतली. देशमुख यांच्या घरी आलेल्या या चोरट्याने त्यांना औषध देण्याचा बहाणा करून त्यांच्या नकळत सोनसाखळी काढून घेतली.