शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्र मल्लाव खून प्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: August 30, 2016 01:53 IST

नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण (पुणे) विभागाच्या पथकाने मध्यरात्री चौघांना अटक केली

शिरूर : नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण (पुणे) विभागाच्या पथकाने मध्यरात्री चौघांना अटक केली. यातील मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक केली नसल्याचे, तसेच त्यांच्या अटकेसाठी शोधपथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रवीण प्रकाश काळे (वय २३, रा. प्रोफेसर्स कॉलनी, जुना नाका नं. ३, शिरूर), विशाल सुनील काळे (वय २१, ढोरआळी, मुंबईबाजार, शिरूर), सनी संजय यादव (वय १९, रा. कामाठीपुरा, शिरूर) व रूपेश हेमंत लुणीया (वय १९, सोनारआळी, शिरूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. फिर्यादीत नमूद केलेल्या नानू कुर्लप व गणेश कुर्लप यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. रविवारी (दि. २८) भरदुपारी येथील रामआळीत मल्लाव यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी मल्लाव यांचे बंधू गणेश मल्लाव यांनी फिर्याद दाखल केली होती. हत्येनंतर मल्लावसमर्थकांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली. जमावाने जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तसेच पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना हवाली करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, संध्याकाळी पाचच्यादरम्यान आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार, सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी जमावाला शांत करण्यात यश मिळविले. जमाव शांततेत घरी परतला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. फिर्यादीत संशय व्यक्त केलेल्या चौघांना पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले. कुर्लपबंधूंच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. या चौघांना उद्या न्यायालयात जर केले जाणार आहे. (वार्ताहर)