शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगाव येथील गोळीबार प्रकरणी चार आरोपी गजाआड

By admin | Updated: May 12, 2015 04:13 IST

रांजणगाव एमआयडीसीमध्ये गोरक्ष नानासाहेब काळे यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार करून पसार झालेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे

पुणे : रांजणगाव एमआयडीसीमध्ये गोरक्ष नानासाहेब काळे यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार करून पसार झालेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ४ पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दोन गटांतील वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभारी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश पांडुरंग काळे, गणेश श्रीरंग महाजन, सतीश रावसाहेब रासकर, केतन हंसराज सल्ले अशी आरोपींची नावे असून, नगर व पुणे जिल्ह्यांत त्यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. निमोणे गावात पोलीस पथकाने केलेल्या चौकशीत शब्बीर शेख व गणेश काळे यांना ग्रामस्थांकडून जबर मारहाण झाल्याची माहिती पुढे आली. शेख याच्या मुलाने एका मुलीची छेड काढल्यावरून गोरक्ष काळे व या दोघांची भांडणे झाली. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. एक आरोपी शब्बीर शेख याचा या प्रकारानंतर दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. त्या गुन्ह्यात आठ जणांना अटक झाली आहे. (प्रतिनिधी)