पुण्यावर दुहेरी शोककळा; माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:32 IST2026-01-30T08:26:32+5:302026-01-30T08:32:31+5:30

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झालं.

Former Pune Mayor and former Nationalist Congress Party city president Shantilal Suratwala has passed away | पुण्यावर दुहेरी शोककळा; माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

पुण्यावर दुहेरी शोककळा; माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Pune Ex Mayor Shantilal Suratwala Passes Away :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्याच्या राजकारणातून एक मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले

शांतीलाल सुरतवाला यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नव्हती, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि कल्पक प्रशासक म्हणूनही ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली. १९७९ ते २००७ या प्रदीर्घ काळात त्यांनी नगरसेवक आणि महापौर म्हणून शहराची सेवा केली..

शरद पवारांचे निकटवर्तीय 

शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणाऱ्या सुरतवाला यांना शरद पवारांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी दिली होती. ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते. तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठा दबदबा होता.

'रस्ते धुण्याची कल्पना' देणारे कल्पक महापौर

सुरतवाला यांनी महापौर असताना पुण्याच्या विकासासाठी अनेक अभिनव कल्पना मांडल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे शहर रस्ते धुण्याची योजना. शहरातील प्रमुख १२ रस्ते कात्रज तलावाच्या पाण्याने धुण्याची आणि त्याद्वारे प्रदूषण कमी करण्याची त्यांची योजना होती. रस्ते धुण्यापूर्वी तेथील खड्डे बुजवून वाहतूक कोंडी फोडण्याचा त्यांचा मानस होता. 

शहरात हळहळ

अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आधीच कडकडीत बंद आणि दुखवटा पाळला जात असतानाच, सुरतवाला यांच्या जाण्याने पुणेकरांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे तडीस नेणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title : पुणे के पूर्व महापौर शांतिलाल सूरतवाला का कैंसर से जूझने के बाद निधन

Web Summary : पुणे के पूर्व महापौर शांतिलाल सूरतवाला का 76 वर्ष की आयु में कैंसर से जूझने के बाद निधन हो गया। वे सामाजिक कार्यों और शहर की सड़कों को धोने जैसे नवीन विचारों के लिए जाने जाते थे। शरद पवार के करीबी सहयोगी सूरतवाला के निधन पर पुणे में शोक है।

Web Title : Pune's Former Mayor Shantilal Suratwala Passes Away After Cancer Battle

Web Summary : Former Pune Mayor Shantilal Suratwala passed away at 76 after battling cancer. Known for his social work and innovative ideas like washing city roads, Suratwala was a close associate of Sharad Pawar. Pune mourns the loss of a dedicated leader.