शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू लावून राजीनामा देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबरला फिर्याद दिली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ मध्ये कोथरूडमधील हॉटेल किमया येथे घडल्याने जळगाव जिल्ह्यातून हा गुन्हा कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तानाजी केशव भोईटे, नीलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा इंगळे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या गैरकारभारामुळे शासनाने त्यावर २०१२ मध्ये प्रशासक नेमला होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर १८ जण निवडून आले होते.

तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठीराख्यांचा पराभव झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादी पाटील यांना नीलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगावला येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुण्याला बोलावण्यात आले. हॉटेल किमया येथे तानाजी भोईटे यांनी ‘ही संस्था गिरीशभाऊला हवी आहे़ आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे,’ असे सांगितले. पाटील व महेश पाटील यांनी त्यास नकार दिल्यावर नीलेश भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल लावला. महाजन यांनी ‘तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था नीलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक’, असे सांगितले. त्याला पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना संस्थेचे रेकॉर्ड देण्यासाठी सदाशिव पेठेत घेऊन गेले. तेथे त्यांचे हातपाय बांधून मारहाण केली. गळ्याला चाकू लावून त्यांचे कपडे काढून डांबून ठेवले.

सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर ‘एमपीडीए’च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. राजीनामे देण्यास नकार दिल्याने खंडणी स्वरूपात ५ लाख रुपये घेऊन संस्थेत कुऱ्हाडीसह प्रवेश करुन तोडफोड करून संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खिशातील ५ हजार रुपये व दोन तोळ्यांची साखळी तोडून घेऊन गेले.

आरोपींनी फिर्यादी व इतरांना संस्थेत जाण्यापासून मज्जाव केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

------------

जानेवारी २०१८ मधील घटना;

तेव्हा दबाव; आता दिली फिर्याद

सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले, आम्ही गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या गुन्ह्यात त्यांची भूमिका काय आहे, याची पडताळणी करून या संस्थेचे कार्यालय जळगाव येथे आहे. एफआयआरमध्ये नामांकित व्यक्तींकडून तोडफोड केली. पुणे शहरात केवळ अपहरण आणि धमकीची घटना घडली आहे. ही घटना जानेवारी २०१८ मध्ये घडली आहे. तक्रारदाराला गेल्या दोन वर्षांपासून भीती व दबाव होता आणि तो आता तक्रार देण्यासाठी पुढे आला आहे. पुणे पोलिसांना काल रात्री जळगाव पोलिसांकडून ही आठ पानी एफआयआर मिळाला आहे.