शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॉवर, लसणाच्या भावात वाढ

By admin | Updated: August 3, 2015 04:09 IST

घाऊक बाजारात फ्लॉवरची आवक घटल्याने भावात रविवारी दुपटीने वाढ झाली. कांदा, लसुण, तोंडली, शेवगा, वालवर, घेवडा, पावटा या फळभाज्यांचे

पुणे : घाऊक बाजारात फ्लॉवरची आवक घटल्याने भावात रविवारी दुपटीने वाढ झाली. कांदा, लसुण, तोंडली, शेवगा, वालवर, घेवडा, पावटा या फळभाज्यांचे भावही वाढले आहेत. पालेभाज्यांची आवक चांगली होत असल्याने भावात फारसा चढ-उतार झाला नाही.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. काही दिवसांपासून पुणे विभागातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. तर काही भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या बाजारात काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे या भाज्यांचे भाव वाढले आहेत. लसणाच्या भावातही सुमारे १०० रुपये वाढ झाली आहे. फ्लॉवरची आवक कमी झाल्याने भावात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे फ्लॉवरचे भाव १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहचले. तोंडली, वालवर व पावट्याच्या भावात ५० ते ६० रुपये वाढ झाली आहे. शेवग्याच्या भावात सुमारे १५० रुपये तर घेवड्याच्या भावात १०० रुपये वाढ झाली. पडवळ, बीट व मटारच्या भावात ८० ते १०० रुपयांची घट झाली. पालेभाज्यांची आवक नियमितपणे चांगली होत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव स्थिर राहिले. रविवारी कोथिंबिरची आवक सुमारे दीड लाख जुडी तर मेथीची सुमारे १ लाख जुडी आवक झाली. रविवारी घाऊक बाजारात परराज्यांतून बेळगाव व धारवाड येथून ४ ते ५ टेम्पो मटार, कर्नाटकातून ७ ते ८ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची तर इंदूर येथून ५ ते ६ टेम्पो गाजराची आवक झाली. तसेच मध्य प्रदेशातून ३ ते ३.५ हजार गोणी लसूण आणि इंदूर व आग्रा येथून ७० ट्रक बटाट्याची आवक झाली. (प्रतिनिधी)