शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर महापूर

By admin | Updated: September 25, 2015 01:46 IST

संपूर्ण देशाचे आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला आता रंग भरू लागले असून, आरास पाहण्यासाठी गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागले आहेत़

पुणे : संपूर्ण देशाचे आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला आता रंग भरू लागले असून, आरास पाहण्यासाठी गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागले आहेत़ स्पिकरवरील बंधन बुधवारपासून रात्री १२ पर्यंत शिथिल करण्यात आल्याने उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढताना दिसत होती़ बकरी ईदची शुक्रवारी आणि चौथा शनिवार अशा जोडून सुट्ट्या आल्याने त्याचा फायदा घेऊन मंडळांचे देखावे पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गुरुवारी सायंकाळपासूनच घराबाहेर पडले होते़ रात्र जशी वाढत गेली तसे शहरातील सर्व रस्ते भरून वाहताना दिसत होते़़ वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पोलिसांनी मध्य वस्तीतील अनेक रस्ते सायंकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद केले़ आकर्षक देखाव्यांबरोबरच जिवंत देखावे सादर करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे़ त्यात प्रामुख्याने मंडळातीलच प्रमुख कार्यकर्ते विविध भूमिका साकारतात़ त्याचबरोबर एका कथेमध्ये प्रसंगांची गुंफण करून ती सादर केली जात असल्याने हे प्रसंगनाट्य पाहण्यासाठी मंडळांसमोर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसत होते़ अन्य देखावे पाहताना लोक २ ते ३ मिनिटे थांबून पुढे जात असतात़ पण, जिवंत देखाव्यामध्ये १० ते १५ मिनिटांचे संपूर्ण नाट्य असते़ तरीही संपूर्ण वेळ थांबून हे देखावे पाहत असल्याचे दिसून येत होते़ याशिवाय बंद मंडपात एनिमेटेड देखावे पाहण्यासही गर्दी झालेली दिसत होती़ त्यासाठी असे देखावे सादर करणाऱ्या मंडळांच्या बाहेर भाविकांच्या मोठ्या रांगाही दिसत होत्या़ ४पोलिसांनी रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असले, तरी काही वाहनचालक मधूनच घुसून आपले वाहन पुढे नेत होते़ त्यातून काही ठिकाणी वाहतूककोंडीचा अनुभवही येत होता़ देखावे पाहण्यासाठी मध्य वस्तीतील रस्त्यांवर उशिरापर्यंत गर्दी झाली होती़