शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

फिरोदिया करंडकाला जल्लोषात सुरुवात

By admin | Updated: February 21, 2017 03:16 IST

तिसरी घंटा होते, पडदा सरकतो आणि रंगमंच प्रकाशाने देदीप्यमान होतो. आता कोणता आविष्कार सादर होणार, याची उत्कंठा

पुणे : तिसरी घंटा होते, पडदा सरकतो आणि रंगमंच प्रकाशाने देदीप्यमान होतो. आता कोणता आविष्कार सादर होणार, याची उत्कंठा प्रत्येकाच्या मनात दाटते आणि क्षणार्धात मंचावर एकाचवेळी अभिनय, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचा मनोहारी खेळ सुरू होतो. या कलासंगमातून जणू एक चित्रपटरूपी दृश्याविष्कारच अनुभवत असल्याची प्रचिती येते, आणि हृदयातून ओठात येते ती एक उत्स्फूर्त ‘दाद’! या अभूतपूर्व कलाविष्कारांचे प्रतिबिंब उमटणारे व्यासपीठ म्हणजे ‘फिरोदिया करंडक’. या स्पर्धेला विद्यार्थ्यांच्या जल्लोषात सोमवारी सुरूवात झाली. आपल्या महाविद्यालयांच्या सादरीकरणांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थ्यांची लागलेली चढाओढ अन् कलाविष्कारांविषयीची शिगेला पोहोचलेली उत्सुकता अशा भारावलेल्या वातावरणात ही स्पर्धा रंगली.अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे संकल्पक आणि प्रमुख संयोजक सूर्यकांत कुलकर्णी, जयश्री फिरोदिया, मीनल परांजपे यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचा प्रारंभ गतवर्षीच्या विजेत्या महाविद्यालयाने करण्याची प्रथा आहे, त्यानुसार सकाळच्या सत्रात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) च्या दर्जेदार सादरीकरणाने झाला. त्यानंतर एमएमसीओई व राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकसे बढकर एक प्रयोगांनी रंगत आणली. सायंकाळच्या सत्रात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, एआयएसएसएमएस व पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या एकांकिका सादर झाल्या. (प्रतिनिधी)स्पर्धेत ३१ संघांचा सहभागस्पर्धेची ही प्राथमिक फेरी दि. २४ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. मागील वर्षीच्या एकूण स्पर्धेतून १५ संघांची थेट प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार यंदाच्या वर्षी या फेरीमध्ये एकूण ३१ संघ सहभागी झाले आहेत. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडल्या जाणाऱ्या संघांची घोषणा दि. २४ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर स्पर्धेची अंतिम फेरी २ मार्चला होईल, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक अंजिक्य कुलकर्णी यांनी दिली.