लोणी काळभोरला दारू पिण्यावरून दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:22 IST2021-02-21T04:22:53+5:302021-02-21T04:22:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : हॉटेलमध्ये दोन मित्र जेवण करत असताना शेजारच्या टेबलवरील चार मुलांनी तुम्ही काय म्हणता, ...

Fighting between two groups over drinking butter | लोणी काळभोरला दारू पिण्यावरून दोन गटांत हाणामारी

लोणी काळभोरला दारू पिण्यावरून दोन गटांत हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : हॉटेलमध्ये दोन मित्र जेवण करत असताना शेजारच्या टेबलवरील चार मुलांनी तुम्ही काय म्हणता, असे म्हणत एकास हाताने तर दुसऱ्यास बिअरची बॉटल मारल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी तुषार अनिल माने (वय ३०, रा. शिंदवणे, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश चौधरी, मोन्या घोडेवाला, अण्या घोडेवाला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही. तिघे रा. कुंजीरवाडी, हवेली) व रिक्षावाला (नाव व पत्ता माहिती नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी ५.३० च्या सुमारास कुंजीरवाडी गावच्या हद्दीत घडली कुंजीरवाडी येथील एका हॉटेलमध्ये माने व त्याचे मित्र आशिष शेळके जेवण करत होते. यावेळी त्यांच्या शेजारी टेबलवर चौघे जेवण करत होते. तेव्हा माने व शेळके या दोघांमध्ये बोलणे चालू होते. त्यावेळी शेजारच्या टेबलवरील ती चार मुले टेबलजवळ येवुन दोघांना तुम्ही काय म्हटला? असे म्हणून शिवीगाळ करू लागले. याबाबत त्यांनी विचारणा केली असता चौघांनी त्यांना टेबलावरील बिअरच्या बाटलीने डोक्यात हातावर मारहाण केली. त्यामुळेे त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येवू लागल्याने ते पळून महामार्गावर आले. त्यावेळी ते चारजण तेथून निघुन गेले. त्यानंतर तुषार यांचा भाऊ रोहन माने याने त्यांना चिंतामणी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: Fighting between two groups over drinking butter