शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:51 IST

नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज परिसरातील शेतकरी शासनाकडे करत आहे

ओतूर (जुन्नर) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. सायंकाळी मोठ्या आवाजात भितीलायक विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची धांदल उडवली. माळशेज परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे उन्हाळी टोमॅटो, गहू, कांदे, बाजरी,काकडी, धना आदी पिके भूईसपाट झाली असून, इतर शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमणावर नुकसान झाले. डिंगोरे, मढ, पारगाव, वाटखळे, पिंपळगाव जोगा शिवारात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या भागातील नुकसानीच आकडा मोठा आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट कोसळले आहे.         रविवारी अवकाळी पावसाचा जोर परिसरात अधिक होता. दुपारी ४.३० वाजता पावसाला  अचानक सुरुवात झाली ५.३० पर्यंत पाऊस सुरू होता. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने धुळीचा लोट आकाशात उडत होते. अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव जोगा व कोळवाडी या हद्दीत  झाडे पडली. कित्येक तास रस्ता बंद होता. शासकीय यंत्रणा लवकर न आल्याने वाटसरू रस्ता मोकळा करत असल्याचे निदर्शनास आले.

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. एक तास झालेल्या पावसाने परिसरास अक्षरशः झोडपले त्यात आंब्याचे, आमराईंचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घराची कवले तसेच पत्रे उडाले, वीट भट्ट्यांचे देखील नुकसान झाले. उन्हाळी कांदा काढणी केलेल्या कांद्याच्या आरणी खालून पाणी गेले व काढणीला आलेल्या कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज परिसरातील शेतकरी शासनाकडे करत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरीJunnarजुन्नरWaterपाणीMONEYपैसाweatherहवामान अंदाज