शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरला फुलपाखरांचा उत्सव

By admin | Updated: October 7, 2016 03:45 IST

पावसामुळे डोंगरदऱ्यांवर हिरवई नटली आहे. पाने, फुले, पक्षी, नाले, पठार, झुऱ्या ... सगळा निसर्ग फुलला आहे. रानात फिरताना फुलांवर बागडणारी, सगळीकडे भिरभिरनारी

घोडेगाव : पावसामुळे डोंगरदऱ्यांवर हिरवई नटली आहे. पाने, फुले, पक्षी, नाले, पठार, झुऱ्या ... सगळा निसर्ग फुलला आहे. रानात फिरताना फुलांवर बागडणारी, सगळीकडे भिरभिरनारी नाजूक, छोटीशी, चमदार, रंगीबेरंगी, मन मोहून टाकणारी फुलपाखरे सध्या रानावनात दिसत आहेत. भीमाशंकर सारख्या अभयारण्यात अनेक विविध रंगी फुलपाखरांचा उत्सव जणू भरला आहे. पावसाच्या धारा या वर्षी भरपूर पडल्या. या पावसाने सगळा निसर्ग फुलून गेला. वेगवेगळी फुले, वेली, गवते, झाडे चमकू लागली आहेत. हा निसर्ग पाहताना यातील फुलपाखरे सगळ्यांच्या नजरा आकर्षित करून घेतात. जैव विविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात सुमारे अडीचशे फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. पुणे जिल्ह्यातही भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये अशीच विविध प्रजातींची फुलपाखरे सध्या दिसत आहेत. त्यांच्याकडे नकळतच पर्यटक, अभ्यासक आकर्षित होताना दिसत आहेत. भीमाशंकरच्या जंगलात मोठ्या संख्येने ब्यू मॉरमॉन आढळतात. येथील आदिवासी लोक ब्यू मॉरमॉन फुलपाखराला ‘राणी पाकोळी’ म्हणतात. फुलपाखरू परिसंस्थेला संरक्षण मिळावे व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ब्ल्यू मॉरमॉनला मानचिन्ह केले आहे. फुलपाखरेही निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरे व त्यांची सरवंटे खातात. सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरदऱ्या फुलपाखरांचा हक्काचा अधिवास आहे. येथे ब्यू मॉरमॉन, निलपरी, सरदार, पतंग, लेमन पेन्सी, पियरो अशी विविध प्रजातींची फुलपाखरे आढळतात. याती ब्यू मॉरमॉन फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून मान मिळालेला आहे. राज्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोरावली येथे फुलपाखरू उद्यान बनवण्यात आले आहे. त्याच धरतीवर राज्यातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये फुलपाखरू उद्याने उभारली जाणार आहे. भीमाशंकर अभयारण्यात बनविण्यात येत असलेल्या बेलवनात असे फुलपाखरू उद्यान केले जाणार आहे. यासाठी स्थानिक फुलांची झाले, झाडोरा यांचा अभ्यास करून येथे असलेल्या स्थानिक फूलपाखरांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. -सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभागफुलपाखरांचे उद्यान हवेहा उद्देश सफल करण्यासाठी फुलपाखरू उद्यान उभारले गेले पाहिजे, तसेच फुलपाखरांबाबत जनजागृती व शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या निसर्गात सहली आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने फुलपाखरे आपल्याकडे आकर्षित करून सर्वांना मनस्वी आनंद देत असतात. यासाठी यांचे संवर्धन झाले पाहिजे, अशी वन्यजीव अभ्यासकांची अपेक्षा आहे.