शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती शौर्यपदक विजेत्याचा सत्कार

By admin | Updated: August 31, 2015 03:47 IST

बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील संजय माणिकराव भापकर यांना पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्यपदकाने राज्यपालांच्या

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील संजय माणिकराव भापकर यांना पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्यपदकाने राज्यपालांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीने भापकर यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी भापकर यांनी दर वर्षी गावातील ५ गरजू व गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे जाहीर केले. जिरायती भागातील लोणीभापकर सारख्या गावातील भापकर यांनी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीस सुरुवात केली. सध्या सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रवी पुजारी सह अनेक गुंडांच्या टोळीस जेरबंद करण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या भापकर यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने १५ आॅगस्ट रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी गौरविले. त्यानिमित्ताने लोणीभापकरसह परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने आज नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी भापकर यांनी दर वर्षी गावातील ५ गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर केले. या वेळी ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बाबासाहेब भापकर, रवींद्र भापकर, हनुमंत भापकर, सुरेश भापकर, दिलीप जगदाळे, अ‍ॅड. विक्रमसिंह दांगडे पाटील, एस. एल. भापकर, मुनीर तांबोळी, विलास भापकर यांनी मनोगत व्यक्त केले. संजय भापकर, जयदीप भापकर यांनी सूत्रसंचालन, तर त्रिंबकराव भापकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)