शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

इंदापूरमध्ये ‘उजनी’चे पाणी पेटणार! शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:43 PM

इंदापूरला उजनीचे पाणी देण्यास सोलापुरकरांनी विरोधानंतर आता उजनीचे पाणी चांगलेच पेटणार असल्याचे संकेत आहेत.

इंदापूर (शेटफळगढे): इंदापुरला उजनीचे पाणी देण्यास सोलापुरकरांनी विरोधानंतर आता उजनीचे पाणी चांगलेच पेटणार असल्याचे संकेत आहेत. उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देण्याची तयारी केली आहे.याबाबत शेटफळगढे येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यातआली. यावेळी पार पडलेल्या बैठकीत उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजकारण विसरून शेतकरी या नात्याने एकत्रित लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.

उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलून ते शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यात टाकण्यास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच उजनी वरून  होणाऱ्या लाकडी निबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांवरुन सोलापूर व इंदापूर तालुक्यातील शेतकरी असासंघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम चालू आहे.

तसेच या याविषयी सर्वपक्षीय पाणी संघर्ष समिती स्थापन करण्याची तयारीही इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सध्या चालवली आहे. याबाबतच्या नियोजनाची व या मंजूर योजनेविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली तसेच तालुक्यातील शेती सिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण विसरून या पाण्यासाठीच्या लढ्यात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी  प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून या विषयात साथ द्यावी लागणार आहे." तसेच शेतीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचेही सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, यांचेसह प्रकाश  ढवळे, हनुमंतराव वाबळे, तुकाराम बंडगर , माऊली भोसले ,विराज भोसले,बबन सोलनकर,कैलास वणवे,अमर भोसले,दादा वणवे,रोहीत हेळकर,दादा भोसले,यांच्यासह शेटफळगढे परिसरातील सर्व गावचे शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेUjine Damउजनी धरणWaterपाणीFarmerशेतकरीSolapurसोलापूर