शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

By अण्णा नवथर | Published: May 07, 2024 5:20 PM

Maharashtra lok sabha election 2024 And Narendra Modi : भाजप, एनडीए आघाडीला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत सांगितले.

अहमदनगर : भाजप, एनडीए आघाडीला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत सांगितले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी अहमदनगर येथे सावेडी भागात पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या आयोजन केले होते. या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जणूकाही जाहीरनामा आहे. ओबीसी एससी आदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा इरादा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येत आहे. काँग्रेस हे संविधान बदलण्याचे काम करत आहे.

श्रद्धा, सबुरी हा मंत्र जगाला देणाऱ्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो, अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन, माळीवाडा गणपतीला नमन अशी मराठीतून मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. अहमदनगरचा उल्लेख ही त्यांनी अहिल्यानगरची पुण्यभूमी को प्रणाम असा केला.

बीजेपी व एनडीए आघाडीला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. एनडीएच्या जाहीरनाम्यामध्ये विकास, गरिबाचे कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा आदी विषयांना प्राधान्य दिले आहे. परंतु यापैकी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे? असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेसने खिसे भरण्याचे पाप केले

१९७० पासून निळवंडेचे काम रखडले होते. काँग्रेसच्या काळात फक्त खिसे भरण्याचे पाप केले. मात्र २०१९ मध्ये देवेंद्र फडवणीस यांनी निधी देऊन निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले.

मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांचा काँग्रेसने अपमान केला आहे. असा अपमान करणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात एकही सीट मिळणार नाही, याची तजवीज मतदारांनी केली पाहिजे असेही मोदी यांनी आवाहन केले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAhmednagarअहमदनगर