Join us  

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 4:05 PM

Stock Market Closing Bell: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ३८४ अंकांनी घसरून ७३५१२ अंकांवर बंद झाला.

Stock Market Closing Bell: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ३८४ अंकांनी घसरून ७३५१२ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी १४० अंकांनी घसरून २२३०२ अंकांवर बंद झाला. लोकसभा निवडणुकीत कमी मतदानाचा परिणाम शेअर बाजाराच्या कामकाजावर दिसून येत असल्याचं म्हटलं जातंय.  

शेअर बाजारातील घसरणीमुळे गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालंय. शेअर बाजाराचं कामकाज संपल्यानंतर मंगळवारी निफ्टी ५० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली बंद झाला. बीएसई सेन्सेक्स तीन दिवसांत १००० अंकांनी घसरला असून बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ११ लाख कोटी रुपयांनी घसरलंय. 

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारादरम्यान निफ्टी आयटी आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकांनी तेजी घेतली, तर निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह बंद झाले. 

मल्टीबॅगर शेअरची स्थिती 

कामकाजादरम्यान फिनोलेक्स केबल आणि गरवारे टेक्निकल फायबर्सचे शेअर्स वधारले, तर टायटन, पिडिलाईट, सर्वोटेक पॉवर, महिंद्रा हॉलिडेज, कोरोमंडल इंटरनॅशनल, पॉलीकॅब, युनि पार्ट्स इंडिया, होम फर्स्ट फायनान्स, गेटवे डिस्ट्रीपार्क, जेनसोल इंजिनीअरिंग, फेडरल बँक, अशोक लेलँड आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स यांचे शेअर्स घसरले. 

गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत, तर अदानी विल्मर किरकोळ वाढीसह बंद झाला. गौतम अदानी समूहाच्या अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअरमध्ये चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजार