शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक न्यायालय 'ई-फायलिंग'मध्ये अग्रेसर;वकिलांचा वेळ वाचला

By नम्रता फडणीस | Updated: June 26, 2025 16:20 IST

पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे.

पुणे : देशभरातील न्यायालयांसाठी रोल मॉडेल ठरलेले पुण्यातील कौटुंबिक न्यायालय ‘ई-फायलिंग’मध्ये अग्रेसर ठरले असून, न्यायालयीन कामकाज १०० टक्के पेपरलेस करण्यात कौटुंबिक न्यायालयाला यश मिळाले आहे. पेपरलेस कामकाजामुळे आता फाइल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून, ई-फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज ई-फायलिंगद्वारे करण्याची अधिसूचना काढली. त्यानुसार जिल्ह्यामधील न्यायालयांनी ‘ई-फायलिंग’ प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली असली, तरी अजूनही जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ई फायलिंग’ प्रणालीचा १०० टक्के वापर होताना दिसत नाही.

ई-फायलिंग प्रक्रियेत विविध प्रकारच्या समस्या वकिलांना उद्भवत असून, न्यायालयीन कामकाजाला विलंब होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याला पुण्याचे कौटुंबिक न्यायालय अपवाद ठरले आहे. कौटुंबिक न्यायालयाचे बहुतांश कामकाज पेपरलेस होत असून, केवळ ई-फायलिंगद्वारेच दावे दाखल होत असल्याचे वकिलांनी सांगितले.

ई-फायलिंगमुळे पक्षकारांना मेसेजद्वारे जाते सुनावणीच्या तारखेचे नोटिफिकेशन

एखादी केस ई-फायलिंग केल्यावर दोन्ही पक्षकारांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. ई-फायलिंगमध्ये तुमच्या विरुद्ध केस दाखल झाली आहे, हे नोटीफाय होते. तुमच्या या क्रमांकाची केस रजिस्टर झाली असून, तारीख कोणती पडली आहे, याचे पक्षकारांना मेसेज पाठवले जातात. वकिलांनादेखील मेल केला जातो.

ई-फायलिंग म्हणजे काय?

ई-फायलिंग म्हणजे न्यायालयात दाखल करायच्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन प्रणाली वापरणे. या प्रणालीमुळे वकिलांना आणि पक्षकारांना कोणत्याही ठिकाणाहून न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहता, ऑनलाइन अर्ज, शपथपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे दाखल करता येतात.

ई-फायलिंगचे फायदे

१) न्यायालयाच्या चकरा वाचल्यामुळे प्रवासाच्या आणि इतर खर्चात बचत होते.

२) ऑनलाइन प्रणालीमुळे कागदपत्रे सुरक्षित राहतात.

३) केससंबंधी माहिती ऑनलाइन उपलब्ध असल्याने कामकाज अधिक पारदर्शक होते.

पूर्वी कौटुंबिक न्यायालयात कागदपत्रे फायलिंगसाठी दिली जायची. तिथे माणूस उपलब्ध असेल किंवा नसेल तरी पंधरा दिवसांनी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन व्हायचे. त्यानंतर फायलिंग क्रमांक पडून केस कोर्टात जात असे. यात कागदपत्रे गहाळ होणे किंवा आम्हाला कागदपत्रेच मिळाली नाही. त्यामुळे प्रक्रिया लांबली जायची. पण ‘ ई-फायलिंग’मुळे हा सगळा प्रकार थांबला आहे. आता कागदपत्रे पाहिली नाहीत किंवा कागदपत्रे मिळाली नाहीत, हे कुणीच नाकारू शकत नाही. वकीलपत्र असलेल्या प्रत्येक वकिलाला ई-फायलिंगचा ॲक्सेस मिळतो. त्यामुळे वकिलांना केससाठी तत्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देता येतात. एखाद्या वकिलाची फाईल हरवली, तरी ई-फायलिंगमध्ये कागदपत्रे सेव्ह असल्याने वकिलांना फाईल घेऊन फिरायची गरज भासत नाही. ई-फायलिंगचे कामकाज वकिलांसाठी फायदेशीर ठरत आहे. - ॲड. प्रसाद निकम  

कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंगद्वारे केस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वकिलांचा वेळ वाचला आहे. कोणत्याही ठिकाणावरून आणि कोणत्याही वेळेस वकील ई-फायलिंगच्या माध्यमातून केस दाखल करणे वकिलांसाठी फायदेशीर ठरत आहे. - ॲड. सुरेश एस. बेराड, मुंबई उच्च न्यायालय

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड