पुण्याच्या शिरूर भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदारांच्या कुटुंबीयांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:58 IST2026-01-20T17:57:28+5:302026-01-20T17:58:17+5:30

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो

Families of former NCP MLAs from Pune's Shirur area join BJP | पुण्याच्या शिरूर भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदारांच्या कुटुंबीयांचा भाजपमध्ये प्रवेश

पुण्याच्या शिरूर भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदारांच्या कुटुंबीयांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश मोदीजींवर प्रचंड प्रेम करत आहेत. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील पक्ष प्रवेशाच्या वेळी ते बोलत होते.  

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्त्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Web Title : पुणे: शिरूर से पूर्व एनसीपी विधायक का परिवार भाजपा में शामिल

Web Summary : पूर्व एनसीपी विधायक पोपटराव गावडे के बेटे राजेंद्र गावडे परिवार सहित भाजपा में शामिल हुए। उन्होंने एनसीपी नेतृत्व द्वारा उपेक्षा और भाजपा के विकास एजेंडे के प्रति सम्मान को इसका कारण बताया। चंद्रकांत पाटिल ने उन्हें पार्टी में उचित सम्मान का आश्वासन दिया।

Web Title : Ex-NCP MLA's Family from Shirur, Pune, Joins BJP

Web Summary : Rajendra Gawde, son of ex-NCP MLA Popatrao Gawde, along with family members, joined BJP citing neglect from NCP leadership and admiration for BJP's development agenda and respect for workers. Chandrakant Patil assured them of proper respect within the party.