शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीत गुन्हेगारीला बसला लगाम

By admin | Updated: October 28, 2015 01:11 IST

मुळशी तालुक्यात मागील अनेक वर्षांत बोकाळलेली गुन्हेगारी काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आल्याची तालुक्यात चर्चा आहे.

पौड : मुळशी तालुक्यात मागील अनेक वर्षांत बोकाळलेली गुन्हेगारी काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आल्याची तालुक्यात चर्चा आहे. अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्यात वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरण, बांधकाम व्यवसाय, मोठ्या प्रमाणात होणारे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार यातून अनेक गुन्हेगार जन्माला आल्याने मागील काही वर्षांत तालुक्यात गुन्हेगारी वाढीस लागली होती. परिणामी तालुक्यात सर्वत्र दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याला तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांचा कचखाऊपणाही कारणीभूत होता. तालुक्यात भडकलेल्या टोळीयुद्धात एकापाठोपाठ एक अशा अनेकांचा बळी गेल्यानंतर पोलीस खात्याला जाग आली व वरिष्ठ स्तरावरून सूत्रे हालू लागली. या बिघडलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी आणणे गरजेचे वाटल्याने दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा गणेश मोरे यांच्या रूपाने एक कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी मुळशीला मिळाला. मोरे यांनी चार महिन्यांत ५६ जणांवर मोक्का लावण्याची धाडसी कारवाई केल्याने येथील गुन्हेगारीला पहिला हादरा दिला. त्यानंतर सारंगकर व आता विश्वंभर गोल्डे असे एकापाठोपाठ कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अधिकारी पौड चौकीला आल्याने तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व विभागीय कार्यालय यांनी संयुक्तपणे धडक मोहीम राबविल्यामुळे सहा महिन्यांत शांतता प्रस्थापित होताना दिसत आहे.