शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

खळबळजनक! माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार १८ एकर शासकीय जागेवर खाजगी व्यक्तीची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:30 IST

वन विभागाच्या पत्रानंतर एकाच दिवसात नोंद रद्द ; खोटी कागदपत्रे दाखल करणाऱ्यांवर तहसिलदारांनी केली फौजदारी 

पुणे : पुण्यातील हडपसर येथील  महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेली वन विभागाची तब्बल 18 एकर जागा माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार थेट खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली. याबाबत पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. हवेली तहसिलदार तृप्ती कोलते यांनी तातडीने नोंद रद्द करून ही 18 एकर जमीन पुन्हा शासनाच्या नावे केली. खोटी कागदपत्रे दाखल करणा-या विरोधी तहसिलदारांनी केली फौजदारी गुन्हे दाखल केला आहे.

हवेली तालुक्यातील गुंठ्याला कोट्यावधी रुपये भाव असलेल्या  मौजे हडपसर येथील स.नं. ६२ मधील तब्बल 7 हेक्टर 68 आर म्हणजे 18 एकर जमीन पोपट पांडुरंग शितकल यांनी चक्क तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच नावाने खोटा आदेश करून हेवील तहसिलदारांना सादर केला. परंतु या आदेशावर केवळ मंत्रीच नाही मंत्रालयातील कक्ष अधिकारी याची सही,  खरी नकल असे सर्व कागदपत्र खोटी सादर केली. यामुळे संबंधित कागदपत्रांच्या आधारे नोंद घालण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये तलाठी व सर्कल यांनी तत्परता दाखवत नोंद मंजूर केली. याबाबत संशय आल्याने कोलते यांनी तपासणी सुरू केली आणि यामध्ये वस्तुस्थिती समोर आली. याबाबत खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. 

दरम्यान, वन विभागाचे राहुल पाटील यांनी ही 18 एकर जमीन राखीव वन असूर , महसूल मंत्र्यांनी खरोखरच असे आदेश दिले का तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार कोलते यांनी थेट मंत्रालयात जाऊन चौकशी केली असता महसूल मंत्री यांनी संबंधित व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्वरीत संबंधित व्यक्तीची नोंद रद्द करून पुन्हा एखदा शासनाचे नावे जमीन करण्यात आली. याच वेळी खबरदारी घेत दुय्यम निबंधक यांना अशा सातबा-यांची खरेदी - विक्रीचे व्यवहार करू नये असे स्पष्ट आदेश दिले. --------खोटी सही, खोटेच शिक्के आणि आदेशही खोटामहसूल मंत्रालयाशी पत्र व्यवहार केला व चर नमूद प्रकरणी केलेल्या आदेशाची सत्यप्रत देण्याची विनंती केली. त्यानुसार 1 सप्टेंबर रोजी महसूल मंत्रालयातून वर नमुद प्रकरणात महसूल मंत्री यांनी दि. ३१/०१/२०१८ रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत प्राप्त झाली. सदर आदेशाचे अवलोकन केले असता, माझ्या असे निदर्शनास आले की, पोपट पांडूरंग शितकल यांनी माझ्या , मंत्री महोदयांनी दिलेल्या दि. ३१/०१/२०१८ रोजीच्या मूळ आदेशामध्ये माझी व शासनाची फसवणूक करण्याचे हेतूने, खोटी सही शिक्के तयार करुन, खोटा आदेश तयार करून खोट्या सह्या करून तयार केलेल्या शिक्क्यांचा वापर करून खोटी / बनावट कागदपत्रे सादर केली.या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. - तृप्ती कोलते, तहसीलदार, हवेली 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातforest departmentवनविभाग