दौंडच्या पूर्व भागाला पाणी सुरू

By Admin | Updated: June 4, 2015 05:24 IST2015-06-04T05:24:54+5:302015-06-04T05:24:54+5:30

खडकवासला पाटबंधारे खात्याच्या पाटस उपविभागातील वितरिका, उपवितरिका आणि बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद केल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला

In the east of the quad, water starts | दौंडच्या पूर्व भागाला पाणी सुरू

दौंडच्या पूर्व भागाला पाणी सुरू

पाटस : खडकवासला पाटबंधारे खात्याच्या पाटस उपविभागातील वितरिका, उपवितरिका आणि बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद केल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी सुरू झाले आहे.
पाटस उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता काशिनाथ देवकाते यांचा प्रभारी चार्ज पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार, अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी काढून घेतला असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे उपविभाग दौंडचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांनी दिली.
बुधवार (दि. ३) रोजी ‘लोकमत’मध्ये ‘अधिकाऱ्यानेच पाणी पळविले, दौंडच्या पूर्व भागातील शेतकरी संतप्त’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली होती. तर, काही शेतकरी हनुमंत पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाच्या तयारीत होते. परंतु पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पाटस पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वितरिका, उपवितरिका आणि बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद केले. त्यामुळे पूर्व भागातील खडकी, रावणगाव, बोरीबेल, गाडेवाडी, शिंगाडेवाडी, काळेवाडी या परिसरात पाणी पूर्ववत झाले. साधारणत: तीन दिवस या भागात पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: In the east of the quad, water starts