शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये राजकीय भूकंप?

By admin | Updated: September 14, 2016 00:45 IST

महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्या निमित्ताने चिंचवडमध्ये राजकीय भूकंप होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.

चिंचवड : महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्या निमित्ताने चिंचवडमध्ये राजकीय भूकंप होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपाने वेगवान हलचाली सुरू केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत चिंचवडमध्ये सर्वच पक्षांना भूकंपाचे धक्के बसणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.चिंचवडकर शहरातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवडमधील ताकद वाढविण्यात भाजपाला यश मिळत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्याही हालचाली सुरू आहेत.प्रभाग पद्धतीमुळे काँग्रेस व मनसेला मात्र उमेदवार मिळणेही कठीण होणार आहे. काँग्रेसमधील गटबाजी व मनसेची सध्याची परिस्थिती पाहता त्यांना निवडणुकीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. भोईरांना आवतन; कोऱ्हाळेंची द्विधा स्थितीभोईर यांच्यासाठी विविध पक्षांचे दरवाजे उघडे आहेत. मात्र, ते नेमकी काय भूमिका घेताहेत, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मुरब्बी असूनही विधान परिषदेला ते मागे पडले. पुन्हा तीच स्थिती ओढवू नये या दृष्टीने त्यांची व्यूहरचना असेल, अशी चर्चा आहे. आमदार जगताप यांनी चिंचवडमध्ये भाजपाची ताकद वाढविली असल्याने त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी ताकदवान नेत्याच्या शोधात आहे. भोईर यांच्या रूपाने ही ताकद उभी करता येईल का, या दृष्टीने अजित पवार चाचपणी करत आहेत. अनंत कोऱ्हाळे यांच्या माध्यमातून मनसेला चिंचवडमधून एक नगरसेवक मिळाला असला, तरीही पक्षाची ताकद वाढलेली दिसत नाही. त्यामुळे कोऱ्हाळेंचीसुद्धा द्विधा मन:स्थिती झाली आहे.