Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:19 IST2025-08-31T12:19:12+5:302025-08-31T12:19:59+5:30

पिंपरी चिंचवड शहरात डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक खाली चिरडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे

Dumper truck driver's bravado for driving outside the stipulated hours; Young man crushed under truck, dies on the spot | Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

Pimpri Chinchwad: नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाचा प्रताप; ट्रकखाली तरुणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा एकदा एका डंपर ट्रक खाली चिरडून एका दुचाकी स्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही वेळापूर्वी किवळे परिसरातील साई द्वारका बिल्डिंग समोर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

 देहू रोड पोलीस स्टेशन कडून डी मार्ट कडे  सर्विस रॉड ने जाणाऱ्या  एका तरुणाला डंपर ट्रक चालकाने त्याच्या वाहनाच्या चाकाखाली चिरडलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर देहू रोड पोलीस दाखल झाले असून  अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

 यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहरात डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक खाली चिरडून कित्येक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. डंपर ट्रक चालक आणि आरएमसी ट्रक चालकांना पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीसाठी एक मर्यादित  वेळ आखून दिली आहे. तरी देखील नियमबाह्य वेळेत  चालणाऱ्या डंपर ट्रक चालकाने आज एका पुन्हा निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. शहरात नियमबाह्य वेळेत चालणाऱ्या डंपर  ट्रक आणि आरएमसी ट्रक चालकांवर पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Dumper truck driver's bravado for driving outside the stipulated hours; Young man crushed under truck, dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.