शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या दणक्यामुळे वाहन धोरणाचा नवा प्रस्ताव

By admin | Updated: January 19, 2015 01:46 IST

महापालिकेच्या पूर्वीच्या वाहन धोरणात स्पष्टता नाही. त्यामुळे कामाच्या गरजेप्रमाणे अधिका-यांना चारचाकी वाहने पुरविली जात होती

पुणे : महापालिकेच्या पूर्वीच्या वाहन धोरणात स्पष्टता नाही. त्यामुळे कामाच्या गरजेप्रमाणे अधिका-यांना चारचाकी वाहने पुरविली जात होती. परंतु, अनेकदा अधिकार नसताना व कोणत्याही परवानगीशिवाय गाडींचा वापर व हद्दीबाहेर गाडी नेल्याचा प्रकार घडला आहे. त्याविषयी वस्तुस्थितीची माहिती घेऊन राज्य शासनाच्या धर्तीवर नवीन वाहन धोरण लवकरच तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आज दिली. स्थानिक संस्था कर, मिळकत कर व बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचे पगार वर्गीकरणाद्वारे करण्याची नामुष्की ओढावली आहे. पालिका आर्थिक संकटात असल्यामुळे विकासकामांना कात्री लावण्यात येत आहे. त्याच वेळी तत्कालीन आयुक्त व सहआयुक्तांच्या तोंडी आदेशाद्वारे महापालिकेतील ३० ते ३५ अधिकाऱ्यांना अ‍ॅम्बेसिडर व कार दिल्यामुळे पालिकेला रोज लाखो रुपयांचा भुर्दंड पडत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी, सध्या किती अधिकाऱ्यांना गाड्या पुरविल्या जातात, त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश व्हेईकल विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पोळ यांना दिले आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या वाहन धोरणाचा अभ्यास करून महापालिकेचे नवीन धोरण तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये वर्ग १ च्या अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन, खातेप्रमुख व प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चारचाकी वाहन देण्याचा विचार नवीन धोरणात करण्यात येणार आहे. साधारण जानेवारीअखेर प्रस्ताव तयार करून मुख्यसभेची मान्यता घेण्यात येणार आहे, अशी माहिती किशोर पोळ यांनी दिली. (प्रतिनिधी)