शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या, आठवड्यात वाढले तब्बल ५०टँकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 9:19 PM

पुणे विभागात आठवड्याभरापूर्वी २८० गावांना व २ हजार ५९ वाड्यांमधील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.मात्र,...

ठळक मुद्देसांगली,सोलापूरने ओलांडली टँकरची नव्वदी

पुणे : दुष्काळाची तीव्रता वाढल्याने पुणे विभागातील टँकरची संख्या सुमारे ३५० पर्यंत वाढली आहे. त्यातच दुष्काळामुळे बाधित होणा-या नागरिकांची  विभागातील संख्या ७ लाख २१ हजारावर गेली असून ३४ हजार ४३१ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील टँकरने नव्वदी ओलांडली असून सोलापूर जिल्ह्यात आठवड्यात ३५ आणि गेल्या दोन दिवसात तब्बल २० टँकर वाढले आहेत. पुणे विभागात आठवड्याभरापूर्वी २८० गावांना व २ हजार ५९ वाड्यांमधील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.मात्र,आठ दिवसात दुष्काळाने बाधित झालेल्या गावांची संख्या ३१४ तर वाड्यांची संख्या २ हजार २९४ झाली आहे.पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ७८ असून साता-यात ८३ टँकर सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यावर पावसाने कृपादृष्टी दाखवली.त्यामुळे अद्याप कोल्हापूरात टँकर सुरू झाले नाहीत. सध्या कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत.सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी केवळ १९ टँकर सुरू होते.मात्र,सध्या मंगळवेढ्यातील नागरिकांना ३३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आठवड्याभरापूर्वी ४९ टँकरने सुरू होते.मात्र,जतमधील टँकरची संख्या आठ दिवसात ५७ पर्यंत वाढली आहे.पुणे जिल्ह्यात ७८ टँकर सुरू असून साता-यात ८३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यात आठवड्यापूर्वी १ लाख ६५ हजार ७६८ नागरिकांना दुष्काळाचा फटका बसला होता. मात्र,आठवड्यात सोलापूरातील दुष्काळबाधितांची संख्या २ लाख २ हजार ८६८ पर्यंत वाढली आहे.तर साता-यातील बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ८९९ वरून १ लाख ५० हजार झाली असून सांगलीतील संख्या २ लाख ५ हजार ७०८ वरून २ लाख २० हजार ३४९ झाली आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ४८ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित आहेत.-------------------- जिल्हा व तालुका निहाय टँकर व बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे:  पुणे : आंबेगाव १२,बारामती २१,दौंड ९,हवेली १,इंदापूर १,जुन्नर ३,खेड ४,पुरंदर ९,शिरूर १७ सातारा : माण ५८,खटाव ९,कोरेगाव १३,फलटण २, सांगली : जत ५७, कवठेमहाकाळ ८,तासगाव ३ ,खानापूर ७,आटपाडी २०, सोलापूर : सांगोला २०,मंगळवेढा ३३,माढा ६,करमाळा १२,माळशिरस ४, मोहोळ ४,दक्षिण सोलापूर ५,उत्तर सोलापूर २,अक्कलकोट २, बार्शी २

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळ