शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाने गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 3:01 AM

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा ...

इंदापूर : ‘‘उजनी धरणातील पाणीपातळी घटत चालली आहे. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे धरणात केवळ २. ०५ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे कृषी संपन्न असलेल्या इंदापूर तालुक्यातील जवळपास ३० गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उजनीतील पाण्याची पातळी दिवसोंदिवस खालावत असल्याने बागायती क्षेत्रातील एक लाख एकर शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. याचा परिणाम उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील व्यवसायांच्या अर्थकारणावर होणार आहे. येत्या दोन दिवसांत उजनी उणेमध्ये जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, व सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बागायती क्षेत्र याच उजनीमुळे समृद्ध झाला आहे. मात्र, यंदाच्या पावसाने ढील दिल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे धरणा काठावरील नागरिक, शेतकरी आणि विविध व्यावसायिक काळजीत पडले आहेत.इंदापूर तालुक्यातील एकूण बागायती शेतीचे क्षेत्र हे सुमारे ८० हजार ते १ लाख एकर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस, डाळींब, केळी, द्राक्ष, चिक्कू, आंबा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असून, ही गावे आर्थिक बाबतीत सक्षम बनली आहेत. मात्र, धरणाने तळ गाठल्याने हे व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.यापूर्वी २०१६ च्या दरम्यान उजनीच्या पाण्यात कमालीची घट झाली होती. त्यावेळी देखील पाण्याअभावी येथील शेती आणि व्यवसाय धोक्यात आले होते. त्यानंतर यावर्षी पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बºयाच गावांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास ३० गावांतील नळपाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचा पुरवठा दिसून येत नाही. उजनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावांना उजनीमधून पाणीपुरवठा करणारे पंपगृह नदीत कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना व शेतकऱ्यांना पुढील दोन महिन्यांत जलसंकटाला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.उजनी नदीपात्रात लाखो शेतकºयांचे कृषिपंप पाण्यामध्ये सोडलेले असायचे. मात्र, सध्या उन्हाळ्याला अवधी असतानाच कृषिपंप पाण्याविना उघडे पडायला लागले आहेत. त्यामुळे पंपांना नवीन जास्तीचे पाईप जोडणी करून नदीपात्रात दूरवर पाईपलाईन करावी लागत आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील शहा, तरडगाव, हिंगणगाव, कांदलगाव, माळवाडी, शिरसोडी, पिंपरी, पडस्थळ, आजोती, कालठण, गंगावळण, पळसदेव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ यासह सुमारे ३० गावे पाणलोट क्षेत्रातील असून या व्यतिरिक्त काही गावे सोलापूर जिल्ह्यातील ही आहेत.आजचा उजनीचापाणीसाठा ( सद्य:स्थिती )एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर, एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी, टक्केवारी ३.८३ टक्के, एकूण टीएमसी ६५. ७१ असून त्यापैकी केवळ २.०५ टीएमसी उपयुक्त साठा आहे.विसर्ग ; बोगद्याद्वारे ६९० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, दहिगाव उपसासिंचनमधून ९० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे, सीना माढा उपसासिंचनमधून २८० क्युसेक्सने, तर कालव्यामधून ३२०० क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. त्यामुळे पाणीपातळी अजून खालावण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई