शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या रस्त्यांमध्ये दोष

By admin | Updated: August 4, 2015 03:29 IST

कसबा पेठेतील तपकीर गल्ली, मोटे मंगल कार्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची बांधणी सदोष झाल्याचा गंभीर प्रकार अतिरिक्त आयुक्त

दीपक जाधव , पुणेकसबा पेठेतील तपकीर गल्ली, मोटे मंगल कार्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची बांधणी सदोष झाल्याचा गंभीर प्रकार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केलेल्या पाहणीमध्ये निष्पन्न झाला आहे. महापालिकेच्या तज्ज्ञ अभियत्यांनी तीन महिन्यांपूर्वीच या रस्त्याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून ते योग्य झाल्याचे प्रमाणित केले होते. अभियत्यांकडून होणाऱ्या रस्त्यांच्या तपासणीवरच यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सिमेंट रस्ते २५ वर्षांपर्यंत टिकतील; त्यामुळे रस्तेबांधणीवर वारंवार खर्च करावा लागणार नाही, असे कारण देऊन महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात सिमेंट रस्तांचे जाळे उभारले जात आहे. वॉर्डस्तरीय निधीतून गल्लीबोळांमध्ये सिमेंट रस्ते उभारण्याची स्पर्धा नगरसेवकांमध्ये सुरू आहे. मात्र, हे सिमेंट रस्ते सदोष पद्धतीने बांधण्यात आल्याने असून, त्यांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात वाहून जाण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे.कसबा पेठेतील तपकीर गल्लीमध्ये नुकताच बनविण्यात आलेला सिमेंटचा रस्ता उखडण्याचे काम रविवारी सुरू होते. पावसाळ्यामध्ये रस्त्यात खड्डे घेण्यास किंवा इतर कामे करण्यास मनाई असताना रस्ता उखडण्यात येत असल्याने भाजपचे कसबा प्रचार प्रसिद्धिप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘लोकमत’च्या सिटीझन जर्नालिस्ट कॉलमच्या माध्यमातून हा प्रकार उजेडात आणला. त्यानंतर याची माहिती घेतली. सिमेंट रस्त्यांच्या सदोष बांधणी झाल्याने त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.तपकीर गल्लीतील सिमेंट रस्त्याबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी त्या रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे आढळून आले. मोटे मंगल कार्यालयानजीकच्या सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ड्रेनेज व पावसाळी चेंबर उभारण्यात आले आहेत. अगोदरच छोट्या असलेल्या या रस्त्यावर ड्रेनेज व पावसाळी चेंबरची दाटी झाल्याने तेथून वाहने चालविणे अवघड बनले आहे. त्यातच तयार केलेले ड्रेनेजचे चेंबर खचू लागले आहेत. बकोरिया यांनी याची पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने स्वखर्चातून त्याची दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदाराने रविवारीच तातडीने या कामाला सुरुवात केली आहे. सिमेंटचा रस्ते टिकाऊपणा सहा महिन्यांत पाण्यात वाहून जाऊ लागल्याने त्यावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.