शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

दुष्काळाचा सामना करण्यासाठी १३१ कोटींचा आराखडा तयार : पाणी पुरवठ्यासाठी ७१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:18 PM

पाऊस कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा, नळ योजनांच्या दुरुस्तीवर अधिक भर इंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी १२ कोटी ४७ लाख ९९ हजार रुपयांचा आराखड्यात समावेश नळ योजना दुरुस्ती २५ कोटी २ लाख २९ हजार, तात्पुरत्या नळ योजना ७ कोटी ७७ लाख,विहिरींतील गाळ काढण्यासाठी ४ कोटी २० लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार

पुणे : दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुणे विभागाचा १३१ कोटी ४६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा प्रशासनाने सोमवारी जाहीर केला. त्यात पाणी पुरवठा आणि पाणी गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर अधिक भर देण्यात आला आहे. केवळ पाणी पुरवठ्यासाठीच ७० कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नळ दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.  पावसाने ओढ दिल्याने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील ६४ गावे व ४४७ वाड्यांवस्त्यांतील १ लाख २० हजार नागरिकांना तर १४ हजार जनावरांना ६५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जून २०१९ पर्यंतचा १३१ कोटी ४६ लाखांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार ४ हजार ३५३ गावे व ८ हजार ९४३ गावांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता असून, त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.    पाऊस पेरणी कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून २०१९ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, विहीरींचे अधिग्रहण करणे, उपसा सिंचन योजनेची विज बिले भरणे अशा विविध विषयांवर कृती आराखड्यात विचार करण्यात आला आहे. विभागातील टंचाई निवारणासाठी ५१६ गावे व १७८२ वाड्यांमध्ये २४४६ नवीन इंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी १२ कोटी ४७ लाख ९९ हजार रुपयांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. विंधण विहिरींच्या दुरुस्तीसाठी ५३२ कोटी, नळ योजना दुरुस्ती २५ कोटी २ लाख २९ हजार, तात्पुरत्या नळ योजना ७ कोटी ७७ लाख, टँकरने पाणी पुरवठ्यासाठी ७० कोटी ९६ लाख ९२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विहिरींच्या अधिग्रहणासाठी ९ कोटी ३९ लाख ३६ हजार तर विहिरींतील गाळ काढण्यासाठी ४ कोटी २० लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.   

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूरFarmerशेतकरी