झीरो फाउंडेशनच्या वतीने गुरोळी विद्यालयास प्रयोगशाळा साहित्यासाठी देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:32+5:302021-02-05T05:04:32+5:30

हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी प्रशांत कैलास खेडेकर यांचे मार्गदर्शनाने व पुढाकाराने गुरोळी येथील सुसज्य प्रयोग शाळा सहित्यासाठी या रकमेचा उपयोग केला ...

Donation of laboratory materials to Guroli Vidyalaya on behalf of Zero Foundation | झीरो फाउंडेशनच्या वतीने गुरोळी विद्यालयास प्रयोगशाळा साहित्यासाठी देणगी

झीरो फाउंडेशनच्या वतीने गुरोळी विद्यालयास प्रयोगशाळा साहित्यासाठी देणगी

हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी प्रशांत कैलास खेडेकर यांचे मार्गदर्शनाने व पुढाकाराने गुरोळी येथील सुसज्य प्रयोग शाळा सहित्यासाठी या रकमेचा उपयोग केला जाईल असे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी सांगितले. प्रशांत खेडेकर यांच्या पुढाकाराने दर वर्षी विद्यालयातून इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांकसाठी कै. भगवान गोपाळा खेडेकर यांचे स्मरणार्थ रोख स्वरूपात रक्कम 'शिष्यवृत्ती' म्हणून दिली जाते.

२०१९ मध्ये प्रशांत खेडेकर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या संस्थेतर्फे प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी "यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९" प्राप्त झाला होता. त्या पुरस्काराची रक्कम रुपये १५ हजार व त्यामध्ये आणखी १५ हजार रुपये, असे एकूण ३० हजार रुपये देणगी शिष्यवृत्तीसाठी यापूर्वीच प्राप्त झालेली आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांचे वडील कैलास खेडेकर, आई संगीता खेडेकर, माजी सरपंच हिरामण खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप महादेव खेडेकर, बाळासो मचाले, दीपक खेडेकर, हरिचंद्र खेडेकर, कैलास जाधव व मुख्याध्यापक रामदास जगताप उपस्थित होते. स्वागत प्रदीप दुर्गाडे यांनी केले. तर आभार हरिचंद्र खेडेकर यांनी मानले.

गुरोळी येथे रामदास जगताप यांच्याकडे मदत देत असताना झीरो फौंडेशनच्या अध्यक्षा अक्षता खेडेकर समवेत कैलास खेडेकर व इतर

Web Title: Donation of laboratory materials to Guroli Vidyalaya on behalf of Zero Foundation