शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावला बँकेवर दरोड्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2015 00:01 IST

खिडकीचे गज व स्टॉकरूमचा लोखंडी दरवाजा तोडून येथील स्टेट बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केला. परंतु सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले.

कोरेगाव भीमा : खिडकीचे गज व स्टॉकरूमचा लोखंडी दरवाजा तोडून येथील स्टेट बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केला. परंतु सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३१) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना दोन जणांना सायरनचा आवाज आला. त्यांनी वढू चौकात रात्रीच्या गस्तीसाठी तैनात असलेले हवालदार कांबळे यांना सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कांबळे यांनी पोलीस पाटील मालन गव्हाणे यांना सूचना देऊन बँकेजवळ जाऊन तपासणी केली. बँकेच्या आतील सायरन तुटल्याचे निदर्शनास आले. नंतर बँकेच्या स्टॉकरूमची पाहणी केली असता, स्टॉकरूमचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा ब्लेडने कापून आतला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. चोरट्यांनी सर्व्हर रूममध्ये प्रवेश केल्याने सायरन वाजला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी आपल्या पथकासह बँकेत येऊन पाहणी केली. बँकेच्या शाखा व्यवस्थापिका रिना रजपूत आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात एकच चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी पोलीस कंट्रोल नंबरवर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांना मिळताच त्यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळाला भेट दिली. यानंतर बँकेच्या परिसराची पाहणी केली असता चोरट्यांनी वापरलेले हातमोजे, ब्लेड, डोक्याची हिवाळी टोपी, कटावणी आदी साहित्य मिळून आले. (वार्ताहर)