शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीसह नवीन कर नकोच

By admin | Updated: June 13, 2014 04:53 IST

महापालिका हद्दीत एलबीटीच काय पण जकात, व्हॅटवर सरचार्ज तसेच कोणताही प्रवेशकर आकारू नये, अशी ठाम भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

पुणे : महापालिका हद्दीत एलबीटीच काय पण जकात, व्हॅटवर सरचार्ज तसेच कोणताही प्रवेशकर आकारू नये, अशी ठाम भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. तसेच महापालिकेस उत्पन्नासाठी पालिका हद्दीतून दरवर्षी केंद्र तसेच राज्य शासनाकडून वसूल करण्यात येणाऱ्या व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्समधून पालिकेस जो द्यायचा तो हिस्सा द्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार एलबीटीबाबत चर्चा करण्यासाठी महापौर चंचला कोद्रे यांनी शहरातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा कोणताही नवीन कर लावू नये अशी मागणी केली असल्याचे कोद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिका हद्दीतून शहरातील सुमारे १ लाखाहून अधिक व्यापारी दरवर्षी व्हॅटच्या माध्यमातून राज्य शासनास सुमारे १० हजार कोटींचे उत्पन्न देतात, तर सर्र्व्हिस टॅक्ससह दरवर्षी ३९ हजार कोटींचे उत्पन्न जमा होते. त्यामुळे व्हॅटमधून जमा होणाऱ्या निधीतील १० ते २० टक्के हिस्सा राज्य शासनाने महापालिकेस शहराच्या विकासासाठी द्यावा, त्यामुळे पालिकेस दरवर्षी सुमारे २ ते अडीच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्यामुळे एलबीटी रद्द करावाच; शिवाय जकात अथवा व्हॅटवर सरचार्ज तसेच शहरात एन्ट्री टॅक्सही घेऊ नये, असे पुणे व्यापारी महासंघाचे खजिनदार फत्तेचंद रांका यांनी या बैठकीत सांगितले. व्हॅट लागू झाल्यानंतरच इतर सर्व कर बंद करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते; मात्र ते पाळले गेले नाही. त्यामुळे एलबीटीही तत्काळ बंद करावा, अशी मागणी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी केली. तर एलबीटीच्या नोंदणीपासून एलबीटी रिटर्न्स भरण्यापर्यंतची प्रक्रिया किचकट असून हा कर रद्दच करावा अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केली. महापालिकेस दैनंदिन कामकाजासाठी उत्पन्नाची आवश्यकता असल्याने राज्य शासनाने एलबीटी रद्द करून व्हॅट अथवा सेलटॅक्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना महापालिकेचा हिस्सा थेट देण्यासाठीचा कायदा करण्याबाबतचा तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. तर अशा प्रकारचे मॉडेल युती शासनाच्या काळात राबविण्यात आले होते त्याची अंमलबजावणी पुन्हा करण्यात यावी अशी मागणी भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी या बैठकीत केली.या बैठकीस आयुक्त विकास देशमुख, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, नगरसेवक बाबू वागसकर, नगरसेविका मेधा कुलकर्णी, नगरसेवक किशोर शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)